सुशांतसिंह केसमध्ये एक दिवस चमत्कार होईल, शेखर सुमनला ‘आशा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसचा तपास सीबीआय (CBI) करत आहे. परंतु अद्याप काही समोर न आल्यानं त्याचे चाहते, फ्रेंड्स आणि कुटुंब निराश झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) याला आता अशा आहे की, आता या प्रकरणी काही चमत्कार होईल. अलीकडेच शेखर सुमन (Shekhar Suman)  ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. सध्या त्याचे ट्विट्स सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

अलीकडेच शेखरनं एक ट्विट केलं. यात तो म्हणतो, अनेक लोकं मला भेटत असतात जे मला सुशांत केसबद्दल विचारत असतात आणि मी म्हणतो, काश माझ्याकडे प्रार्थना करण्याशिवाय याचं उत्तर असलं असतं.

पुढं शेखर सुमन लिहितो, एके दिवशी या प्रकरणी चमत्कार होईल. असं काहीच नाही राहिलं जे तुम्ही करू शकता.

गेल्या महिन्यातही शेखरनं या प्रकरणी काही ट्विट करत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर आरोप केले होते की, ते सुशांत केसला पुरेसं कव्हरेज देत नाहीत. त्याच्या या ट्विट्सचीही खूप चर्चा झाली होती.

शेखर सुमननं केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. अनेकांनी शेखरचं ट्विट रिट्विट करत प्रतिसाद दिला आहे.

You might also like