‘सिंगर’ नेहा भसीनचा धक्कादायक खुलासा ! म्हणाली – ‘अनेकदा झालेय लैंगिक शोषणाची शिकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील फेमस सिंगर नेहा भसीन (Neha Bhasin) हिनं आपल्या आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. जे ऐकून सारेच शॉक झाले आहेत. ती अनेकदा लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे, असं तिनं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना नेहानं सांगितलं की, ती 10 वर्षांची होती तेव्हा हरिद्वार येथे एका माणसानं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला होता. यानंतर ती हैराण झाली आणि घाबरत आपल्या आईकडे पळत गेली होती.

नेहा पुढं म्हणाली, काही दिवसांनंतर ती पुन्हा एकदा एका हॉलमध्ये शोषणाला बळी पडली. एका माणसानं एका हॉलमध्ये तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. आणि ही घटना तिला चांगलीच आठवत आहे.

तिनं सांगितलं की, तिच्याच पॉप बँडच्या चाहत्यांनी तिला रेप आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती. नेहा सांगते की, आता जर असं काही झालं तर ती गप्प बसत नाही. ती लगेच पोलिसात तक्रार करते.

बोल्डनेसमुळंही नेहा सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होताना दिसली आहे. तिनं याला वैतागून यावर एक गाणंही बनवलं होतं. कहंदे रहंदे असं या गाण्याचं नाव होतं.

 

You might also like