लोकांची मदत करून खरे हिरो बनले सोनू सूद अन् अक्षय कुमार, सोशल मीडियावर भारतरत्न देण्याची मागणी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी सोशल मीडियावर भारत रत्नचा ट्रेंड पाहायला मिळाला. बॉलिवूड स्टार सोनू सूद आणि अक्षय कुमार यांची कामं पाहता त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची मागणी होऊ लागली. अक्षयनं पीएम केअर्समध्ये 25 कोटी दान केलेत म्हणून त्याचं कौतुक होत नाहीये तर 2019 मध्ये पुलवामा अटॅकमधील शहिदांच्या कुटुंबांना मदत, चेन्नई, आसाममध्ये आलेल्या पूरादरम्यान त्यानं केलेली मदत यासाठीही करत आहेत.

त्याप्रमाणे सोनू सूदला भारतरत्न देण्यात यावा अशीही मागणी केली जात आहे. सोनूचं कौतुक लोक, हजारो मजुरांन त्यांच्या घरी पोहोचवणं, कोरोना वॉरियर्सला राहण्यासाठी हॉटेल देणं, पंजबामधील डॉक्टरांसाठी पीपीई किट दान करण्यासाठी यासाठी करत आहेत. अनेकांना ट्विट करत या दोघांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

जेव्हा बिजनेसमन आणि स्तंभलेखक सहेल सेठ यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिम्हा राव यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. याआधी कला क्षेत्रातील भुपेन हजारीका (मरणोत्तर), लता मंगेशकर, रवी शंकर अशा दिग्गजांना भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे.

https://twitter.com/Kangana_Team_/status/1275418695519461381

अक्षय कुमारबद्दल बोलायचं झालं तर त्याला 2009 साली भारत सरकारनं पद्मश्री देऊन सन्मानित केलं आहे. सोनू सूदला अद्याप असा कोणताही सन्मान मिळालेला नाही. परंतु तो सतत मदत करत असल्यानं त्याची फॅन फॉलोविंग वाढली आहे.

https://twitter.com/piyushpandit44/status/1277153250840469504

https://twitter.com/HindustaniBhauG/status/1277147109553254400