सोनू निगमची तब्बल 16 वर्षांनंतर अ‍ॅक्टींगमध्ये वापसी, उद्याच रिलीज होणार शॉर्ट फिल्म ‘स्पॉटलेस’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर सोनू निगम पुन्हा एकदा अ‍ॅक्टींगच्या दुनियेत वापसी करत आहे. यावेळी सोनू एक शॉर्ट फिल्म घेऊन आला आहे. स्पॉटलेस असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. ही शॉर्ट फिल्म अॅसिड अटॅकसारख्या मुद्द्यावर भाष्य करते. सोनूनं या सिनेमाचा ट्रेलरही शेअर केला आहे. स्पॉटलेस ही शॉर्ट फिल्म गुरुवारी 25 जून 2020 रोजी त्याच्या युट्युब चॅनलवर रिलीज होणार आहे.

सोनूची ही शॉर्ट फिल्म आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. सौरभ पांडे डायरेक्टेड या सिनेमात सोनू निगम आणि श्वेता रोहिरा प्रमुख भूमिकेत आहेत. 2004 साली आलेल्या लव इन नेपाल या सिनेमात सोनू अभिनेता म्हणून शेवटचा दिसला होता.

श्वेता रोहिरा ही सलमान खानची मानलेली बहिण म्हणून ओळखली जाते. तिनं पुलकित सम्राटसोबत लग्न केलं होतं जे जास्त दिवस टिकलं नाही.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कामचोर या सिनेमातून त्यानं बाल कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सनी देओलचा डेब्यू सिनेमा बेताब मध्येही त्यानं सनीच्या लहानपीचा रोल केला होता. परंतु 2002 साली आलेल्या जानी दुश्मन- एक अनोखी कहानी या सिनेमातील रोल चाहत्यांच्या लक्षात आहे. हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. सोनूनं नवरा माझा नवसाचा या मराठी सिनेमातही काम केलं आहे.

सोनूच्या सिंगिंग करिअरबद्दल बोलायचं झालं त्याचं सिंगिंग करिअर हे त्याच्या अॅक्टींग करिअरपेक्षाही सफल राहिलं आहे. सोनूनं अनेक सिनेमासाठी हिट गाणी दिली आहेत. हिंदी व्यतिरीक्त सोनूनं प्रादेशिक भाषेतील सिनेमांसाठीही गाणी गायली आहेत.