राष्ट्रपतींच्या हस्ते ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन हे उपस्थित होते.

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकल नाही. त्यामुळे हा पुरस्कार आज (रविवार) प्रदान करण्यात आल्याचे केंद्र सरकारनं जाहीर केले. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांचा सन्मान करण्यात आला.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, ज्यावेळी या पुरस्काराची घोषणा झाली त्यावेळी माझ्या मनामध्ये एकच प्रश्न आला की, माझे काम पूर्ण करण्यासाठी आणि निवृत्तीचे संकेत देण्यासाठी हा पुरस्कार मला दिला जात आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मला अजून काम करायचे आहे असे अमिताभ बच्चन यांनी यावेळी सांगितले.

दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारच्या वतीने देण्यात येतो. भारतीय सिनेमात विशेष योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. दादासाहेब फाळके पुरस्कार पहिल्यांदा 1969 मध्ये अभिनेत्री देविका रानी यांना प्रदान करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांच्या आगोदर विनोद खन्ना, मनोज कुमार, शशि कपूर यांच्यासह अनेक कलाकारांना त्यांच्या विशेष योगदानासाठी देण्यात आला आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !