‘अमर-अकबर-अ‍ॅन्थोनी’च्या सेटवरून ‘बिग बी’ अमिताभनं शेअर केला ‘थ्रोबॅक’ फोटो, धमेंद्र देखील दिसले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असतात. सोशलरवरून ते चाहत्यांसोबत नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. आपल्या पोस्टमुळं ते नेहमीच चर्चेचा हिस्सा बनत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. त्यांनी अमर अक्बर अँथोनी सिनेमातील एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. 1977 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

बिग बींनी अमर अक्बर अँथोनी सिनेमातील एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये बिग बी म्हणतात, “राईटला मान जी(मनमोहन देसाई) सर झुकाए हुए अमिताभ बच्चन, परवीन बाबी, शबाना आझमी, नीतू सिंह, विनोद खन्ना आणि धरम जी ज्यांनी क्लॅप दिला होता. हा सिनेमा मुंईमधील 25 थिएटरमध्ये 25 आठवडे चालला होता. तुम्ही पूर्ण देशाची कल्पना करा.”

अमर अकबर अँथोनी हा एक मल्टीस्टारर सिनेमा होता. आजही हा सिनेमा चाहत्यांना आवडतो सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शनसोबतच कॉमेडीचा तडका पहायला मिळाला होता.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे. याशिवाय त्यांच्याकडे गुलाबो सिताबो हा सिनेमादेखील आहे.