सुशांत सिंह राजपूतला शेवटचा मेसेज करताना ‘या’ अभिनेत्याला आला होता ‘संशय’, शेअर केला ScreenShot !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. प्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानी याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. त्यानं सुशांतला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

अर्जुननं त्याच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुननं सुशांतला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात दिसत आहे की, अर्जुननं सुशांतला गणपतीचा फोटो पाठवत लिहिलं की, आशा आहे सगळं काही ठिक आहे. कॅप्शनमध्ये अर्जुननं सारं काही सांगितलं आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये अर्जुन म्हणतो, “त्याला माझा शेवटचा मेसेज. काहीतरी फील झालं होतं यार. आता वाचशील मेसेज. आपली बाल्कनी आठवत राहिल. कायम म्हणायचा, इतिहास लिहिन. मला माहित आहे जिथं कुठं असशील खुश असशील. तुझ्यामुळं खूप काही बदलणार आहे. चल काळजी घे भावा. जसं मी नेहमी म्हणतो, No RIP For u.”