सुशांतच्या डुप्लीकेटनं शेअर केला ‘हा’ फोटो, लोक म्हणाले – ‘बायोपिकमध्ये कधी दिसणार ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत सारखा दिसणारा एक व्यक्ती पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधीही सुशांतच्या या डुप्लीकेटनं अटेंशन घेतलं होतं. परंतु आपल्या लेटेस्ट फोटोमुळं हा व्यक्ती पुन्हा चर्चेत आला आहे. सुशांतच्या या डुप्लीकेटचं नाव आहे सचिन तिवारी. सचिन तिवारी याचा लेटेस्ट फोटो समोर आल्यानंतर आता अनेक लोक चकित झाले आहेत आणि त्याला सुशांतच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा सल्ला देत आहेत.

सचिननं त्याच्या इंस्टावरून त्याचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोनं पुन्हा एकदा साऱ्यांना चकित केलं आहे. सचिननं हा फोटो शेअर करताना मोटीवेशनल कॅप्शनही दिलं आहे. सचिननं हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.

सचिनचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली. अनेकांनी त्याला सुशांतच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा सल्लाही दिला आहे. सचिननं अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काहींनी त्याला कामाचीही ऑफर दिली. अजूनही युजर्स त्याच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. सचिनचा फोटो झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याआधीही सचिन त्याच्या लुकमुळं असाच जोरदार चर्चेत आला आहे.