‘खिलाडी’ अक्षयला रातोरात काढून अजय देवगणला दिला होता ‘हा’ सिनेमा ! अभिनेत्याचा ‘गौप्यस्फोट’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आउटसाईडर्ससाठी इंडस्ट्रीत आपलं स्थान तयार करणं किती अवघड असतं हे बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या एका किस्स्यावरून समजत आहे. अक्षय कुमारनं एक किस्सा सांगितला आहे की, कशा प्रकारे 90 च्या दशकात एक मोठा सिनेमा हातातून गेला होता. अक्षयनं सिनेमा साईनही केला होता आणि फोटोशुटही केलं होतं. परंतु हा सिनेमा अजय देवगणला देण्यात आला. हा अजयचा डेब्यू सिनेमा होता.

अक्षय कुमारचा एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यानं सांगितलं आहे, कशा प्रकारे त्याच्याकडून सिनेमा काढून घेऊन तो रातोरात अजय देवगणला देण्यात आला होता. हा सिनेमा आहे फूल और कांटे. अक्षय म्हणाला, “1991 साली रिलीज झालेल्या फूल और कांटे मध्ये मी होतो. सिनेमाची मेकिंग, फोटोशुट आणि याव्यतिरीक्त अनेक ठिकाणी मी उपस्थित होतो.”

https://twitter.com/SonuNigam_FC/status/1272861300909985792

अक्षय पुढे म्हणाला, “शुटींगच्या आदल्या रात्री मी तयारी करत असताना मला एक कॉल आला. मला सांगण्यात आलं की, भाई तुम्ही उद्या शुटींगच्या सेटवर येऊ नका. तुम्हाला रिप्लेस करण्यात आलं आहे. आता कुणी दुसरंच सिनेमाचा हिरो आहे.”

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. याशिवाय तो आगामी लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे.