‘सुपरस्टार’ रजनीकांतला मिळाली घरात Bomb असल्याची धमकी ! पोलीस करतायेत तपास

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना त्यांच्या घरी बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे. रजनीकांत यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता आणि त्यांच्या गार्डनमधील घरात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलिसांना सूचित करण्यात आलं.

चेन्नईच्या तेय्नाम्पेट पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यावर पोलीस पुढील कारवाई करत आहेत. पोलिसांनी आणि बॉम्ब स्क्वाडची एक टीम रजनीकांतच्या घरी तलाशी घेण्यासाठी आली होती. परंतु नंतर हा कॉल खोटा असल्याचंही समोर आलं. ही सर्वांना दिलासा देणारी बातमी आहे.

तसं पण एखाद्या सेलेब्रिटीला खोटी धमकी दिली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सिनेमात काम करणाऱ्या अशा फेमस कलाकारांना अशा खोट्या धमक्या येत असतात. त्यांना कायमच असा जीवाचा धोका असतो. दिलासादायक बाब ही आहे की त्यांचं कुटुंब सध्या एखदम ठिक आहे.

कोरोनाग्रस्त आहेत रजनीकांत ?

काही दिवसांपूर्वीच रजनीकांत चर्चेत आले होते जेव्हा अभिनेता रोहित रॉयनं त्याच्या इंस्टावरून एक इमेज शेअर केली होती. यात लिहिलं होतं की, रजनीकांत कोरोना पॉझिटीव्ह आढळले. आता कोरोना क्वारंटाईनमध्ये आहे. यासोबत रोहितनं लोकांना मोटीवेट करत सावध राहण्याचा इशारा दिला होता. सुरक्षित राहण्यासाठी मास्क आणि सॅनिटायजर वापरण्याचा सल्लाही त्यानं दिला होता.

हा एक विनोद होता. ट्रोल झाल्यानंतर रोहितनं लिहलं होतं की, “मित्रांना शांत व्हा. एवढे कठोर बनू नका. हा एख विनोद आहे. आण माफ करा कराण मला नाही वाटतं की हा जोक वाईट हेतूनं केला आहे. हा बिल्कुल रजनी सरवाला जोक आहे. माझा हेतू तुम्हाला हसवण्याचा हता. तुम्हाला हर्ट करण्याचा उद्देश नव्हता.”