पुण्यातील BPO कर्मचार्‍यावर सामूहिक बलात्कार प्रकरणी ‘त्या’ दोघांची फाशी रद्द !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील गहुंजे परिसरातील एका बीपीओ सेंटरमध्ये काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी दोषी सुनावण्यात आलेल्यानंतर फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या दोघांची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पुरूषोत्‍तम बोराटे आणि प्रदीप काकडे अशी त्या दोघांची नावे आहेत. पुण्याच्या येरवडा कारागृहात असलेल्या बोराटे आणि काकडे यांना पुणे येथील सत्र न्यायालयाने दि. 10 एप्रिल रोजी वारंट काढत फाशीची तारीख ठरवली होती. 24 जून रोजी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. मात्र, उच्च न्यायालयात धाव घेतली आणि फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत त्यांच्या वकिलांनी दोघांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आता दोघांना 35 वर्ष जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे त्यांचे वकिल युग चौधरी यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –