Bombay High Court | धनगर आरक्षण मागणीला मोठा धक्का! सर्व याचिका फेटाळल्या, कोर्टाने म्हटले, ”धनगर आणि धनगड एकच नाही”

मुंबई : Bombay High Court | धनगर आरक्षण मागणीला आज मोठा धक्का बसला आहे. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच धनगर आणि धनगड एकच नसल्याचे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे धनगर समाजाला शेड्युल्ड ट्राईब म्हणजेच एसटी आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Bombay High Court)

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कोमल खाटा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. यासंदर्भातल्या सगळ्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

भटक्या विमुक्तांमधून अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासाठी ही मागणी केली जात होती. मात्र यासंदर्भातील याचिका फेटाळल्या आहेत. न्यायालयाने म्हटले की, धनगर समाजाची मागणी मान्य करता येणार नाही.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि कमल खाटा यांनी धनगर आरक्षणाच्या सगळ्या याचिका फेटाळून लावल्याने आता
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा एकमेव मार्ग धनगर समाजाकडे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | अजित पवारांच्या या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या, आता सांगाव्या लागतील, आव्हाडांची टीका, ”त्यांना हिंदी…”

Prithviraj Chavan | तपास यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडायचे, नेत्यांना धमकवायचं, हेच भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांनी कामांच्या वर्क ऑर्डर देण्याची मुदत सात मार्चपर्यंत वाढविली

Pune PMC-Abhay Yojana 2024 | ओपन प्लॉट्सच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा अद्याप निर्णय नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

Sena Kesari 2024 In Pune | पुणे: हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम (Video)