Bombay High Court | …तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवरील औरंगाबाद नाव बदलू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर (Renamed Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर धाराशिव (Dharashiva) करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या (State Government) या निर्णयाला केंद्र सरकारचा (Central Government) हिरवा कंदील मिळाल्यानंतर दोन्ही शहरांचे नामांतर करण्यात आले. मात्र, या नामांतराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले आहेत. अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिल्या आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी मुस्लिम बहुल विभागात नावं तातडीनं बदलण्याची जणू मोहीमच हाती घेतल्याचा याचिकाकर्त्याने कोर्टात आरोप केला. यावर सुनावणी करताना नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर (Government Documents) बदलू नका असे आदेश न्यायालयाने दिले. तर औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरील याचिकेवर पुढील सुनावणी 7 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

 

याचिकाकर्त्याने आपली भूमिका मांडताना, शहरातील टपाल कार्यालय, महसूल, स्थानिक पोलीस, न्यायालय इथ संभाजीनगरचा खुलेआम उल्लेख आणि वापर सुरु झाल्याची हायकोर्टात तक्रार केली. मुस्लिम बहुल विभागात नाव तातडीनं बदलण्याची जणू मोहीमच हाती घेतल्याचा याचिकाकर्त्याने कोर्टात आरोप केला. यावर सुनावणी करताना नामांदराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, असे होत असेल तर ते तातडीने थांबवा, असे न्यायालयाने म्हटले.

 

उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
उस्मानाबादचं धाराशिव करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे.
सध्या या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत सरकारी कार्यालयांनी उस्मानाबाद नावात बदल करु नयेत,
असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
याबाबत एक पत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आलं आहे.

 

Web Title :- Bombay High Court | chhatrapati sambhaji nagar do not change aurangabad name on government documents till final decision court order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पिसोळीत ज्येष्ठ नागरिकाचा खून, कोंढवा पोलिसांकडून तासाभरात मारेकरी गजाआड

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)