Bombay High Court | 7 वर्षाच्या प्रत्यक्ष साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका अल्पवयीन मुलीची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, लहान मुलांची साक्ष कायद्यानं विश्वासार्ह ठरत नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) हत्येच्या आरोपात (Murder Case) जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तसेच अशाप्रकारे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) रायगड पोलिसांना (Raigad Police) दिले आहेत.

 

काय आहे प्रकरण?
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये 7 फेब्रुवारी 2017 रोजी सावित्री सागर पवार (Savitri Sagar Pawar) या महिलेचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची तक्रार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात (Shrivardhan Police Station) देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला. तपासादरम्यान आरोपी गणेश मांडवकर (Ganesh Mandavkar) आणि मंगेश जाधव (Mangesh Jadhav) यांना पोलिसांनी खूनाच्या गुन्ह्यात अटक (Arrest) केली. पोलिसांनी दावा केला की आरोपी गणेश आणि मंगेश यांनी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेने त्यास विरोध केला असता आरोपी गणेश याने टॉवेलने महिलेचा गळा आवळला तर त्याचा साथिदार मंगेश याने महिलेचे पाय धरुन ठेवले होते. (Bombay High Court)

 

माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे (Mangaon District Sessions Court) अतिरिक्त सत्र न्यायाधीश जहागीरदार (Additional Sessions Judge Jahagirdar) यांच्या पुढे हा खटला चालवण्यात आला. खटल्यादरम्यान एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये 7 वर्षाच्या एका मुलीला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर केले. या मुलीची साक्ष ग्राह्य धरत माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी धरत 28 नोव्हेंबर 2018 रोजी जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली. ही शिक्षा भोगत असताना आरोपी मंगेश जाधव याचा कारागृहात मृत्यू झाला. (Mumbai High Court)

हायकोर्टात असा झाला युक्तिवाद
गुन्ह्यातील आरोपी गणेश मांडवकर यानं या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान दिले. त्याच्यामार्फत अ‍ॅड. आशिष सातपुते (Adv. Ashish Satpute) यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती संभाजी शिंदे (Justice Sambhaji Shinde) आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव (Justice Milind Jadhav) यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यामध्ये अ‍ॅड. सातपुते यांनी कोर्टाला सांगितले की, 7 वर्षाच्या मुलीची प्रत्यक्षदर्शी म्हणून साक्ष ग्राह्य धरता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि भारतीय पुरावा कायद्याच्या न्याय तत्वानुसार (Judicial Principles of Indian Evidence Act) अल्पवयीन मुलांची साक्ष ही विश्वासार्ह नाही. त्यामुळे त्या आधारावर आरोपींना शिक्षा सुनावणे योग्य नाही. हा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने दोन्ही आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. तसेच रायगड पोलीस अधिक्षकांनी (Raigad Superintendent of Police) तत्कालीन तपासाधिकाऱ्यावर चुकीच्या तपासपद्धतीबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.

 

Web Title :- Bombay High Court | High court set aside lif sentence of an accuse convicted in murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amruta Fadnavis | ‘…हरामखोर का मतलब…. है और सुनने मे आया है….नामर्द है’ ! अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या ‘नामर्द’? राजकीय वर्तुळात चर्चा

 

TET Exam Scam | IAS सुशील खोडवेकरची करामत ! सावरीकरकडून घेतले पैसे, सुपेनी केले उमेदवार पास; आयएएस अधिकार्‍याला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

 

Gold Silver Price Today | खुशखबर ! 2 दिवसांमध्ये सोन्याचे दर 1000 रूपयांनी तर चांदी 2500 ने घसरली, जाणून घ्या आजचे दर