Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Radhakrishna Vikhe-Patil | केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर (Matoshree) येऊन रडले होते. भाजपाबरोबर (BJP) चला नाहीतर मला अटक (Arrest) होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं,असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) केला होता. यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.

 

आदित्य ठाकरेंचा पोरखेल संपलेला दिसत नाही. सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण येईल असे वाटत होते. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेत की, त्यांना रडू आवरत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा ‘पप्पू’ होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी केली.

 

विखे-पाटील यांच्या टीकेला ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणजे रोज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. आज या पक्षातून उद्या त्या पक्षात उड्या मारतात.
शिवसेनेतही (Shivsena) होते. कोणता पक्ष शिल्लक राहिला का विचारा, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

 

Web Title :- Radhakrishna Vikhe-Patil | ‘Aditya Thackeray should not be pappu’, Thackeray group’s response to Vikhe-Patal’s criticism

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पर्वती : अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी, 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा

MLA Bachchu Kadu | ‘काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर…’, राहुल गांधींच्या ‘मातोश्री’ भेटीवर बच्चू कडूंचा उपरोधात्मक टोला

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’