फिरायला गेलेले पुण्यातील ‘ते’ दोन्ही कुटुंब सुरक्षित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे दोन कुटुंबीय मंगळवारी (दि.२१) फिरायला गेले होते. मात्र, त्यांच्या मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने नातेवाईकांचे तोंडचे पाणी पळाले. नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाणे गाठून दोन कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दोन कुटुंब अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस यंत्राणा देखील कामाला लागली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबाचा शोध घेऊन ते बेपत्ता झाले नसल्याचे नातवाईकांना सांगितले आणि नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24bd79cc-a6c7-11e8-a9db-bda989be97e8′]

हडपसर येथे राहणारे सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि त्यांचे मित्र जगन्नाथ हरी सातव हे दोघे आपल्या कुटुंबीयांसमवेत मंगळवारी खडकवासला, पानशेतला फिरायला गेले हाेते. त्यांनी खडकवासलापासून चार- पाच किलोमीटरवर असलेल्या अॅक्वेरियस हॉटेलात मुक्काम केला. मात्र, बुधवार (दि.22) सकाळपासून त्यातील 5 जणांचे फोन बंद लागले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32595cbb-a6c7-11e8-8f3f-07d7a7f120c9′]

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप आहेत. ज्या ठिकाणी फिरायला गेले होते. त्याठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नव्हते. त्यामुळे मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते.