बहादूर… !चिमुरड्याच्या छातीत आरपार घुसले लाकूड तरीही डोळ्यात अश्रूचा थेंब नाही 

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – ‘देव तयारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. या म्हणीची प्रचिती येणारी घटना मध्य प्रदेश मधील एका ठिकाणी घडली आहे. आपल्या लहान बहिणीला खुश करण्यासाठी एक चिमुरडा बोराच्या झाडावर चढला होता. तो बोर काढण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक खाली पडला आणि त्यावेळी त्याच्या छातीतून झाडाची काठी आरपार झाली. पण तरी देखील या बहादूर मुलांने डोळ्यातून थेंबही काढला नाही. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशच्या बडवाणीमध्ये राहणाऱ्या चिमुरड्याने बहिणीला बोर काढून देण्यासाठी झाडावर चढला. पण झाडावरून खाली पडला तेव्हा त्याच्या छातीत झाडाचे लाकूड आरपार घुसले. विषेश म्हणजे ऐवढं सगळं झालं असताही हा चिमुरड्याने हिम्मत नाही हारली. तो तरीहीदेखील घरी गेला. इतक्या गंभीररित्या त्याच्या छातीतून झाडाचं लाकूड आरपार झालं पण तरीही मुलाच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंबदेखील आला नाही. अगदी गंभीर परिस्थितीत असतानाही तो रुग्णालयात गेला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, त्याचं आता ऑपरेशन होणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. छातीतून पाठीच्या बाजूने लाकूड बाहेर निघाल्यामुळे त्यांच्या शरिरामध्ये अनेक जखमा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.आपल्या बहिणीसाठी स्वत:च्या जीवाची परवा न करणाऱ्या हा चिमुरडा लवकर बरा व्हावा हिच प्रार्थना!

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us