प्रियकराने प्रेयसीचा केला खून 

मंगळवेढा : पोलीसनामा 

अघोरी कृत्याच्या व्यवसायातून आलेल्या पैशाच्या कारणावरुन प्रेयसीला जबरदस्तीने विषारी औषध पाजून तिचा खुन केल्याप्रकरणी कामती पोलिसांनी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांसह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जिल्हा उपाध्यक्षांचा मुलगा द्वारकेश दिनकर सूर्यवंशी (वय ३३, रा. माने गल्ली, मंगळवेढा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेत गीता वाघमोडे (वय ३५) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी दिनकर सूर्यवंशी, सागर भुईटे (रा. इंचगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गीताची आई सुरेखा शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B008QS9J6Y,B077TVWFLB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’208a0ff3-b722-11e8-9f19-89a3279ceb1c’]

याबाबत पोलिसांनी सांगितल्यानुसार गिता वाघमोडे या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शुभम झेरॉक्स सेंटरमध्ये कामास होती. तेथे द्वारकेश सुर्यवंशी हा झेरॉक्स काढण्यासाठी येत असल्याने यांची २०१३ पासून ओळख  होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते दोघे वडदेगाव येथील शेतातील वस्तीवर राहत होते. गीताची आई सुरेखा शिंदे यांना त्यांचा नातू सुयोग गाडेकर याने फोन केला. गिता हिने विष पिले असून तिला उपचारासाठी मंगळवेढा येथे आणले असून ती उपचारापूर्वी मयत झाली आहे असे सांगितले.

द्वारकेश सूर्यवंशी, शुभांगी सूर्यवंशी, सागर भुईटे यांनी संगनमत करून गीताला जिवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने विषारी औषध पाजून तिचा खून केला व  तिने स्वत: विष पिले असा बनाव रचला असल्याचे  सुरेखा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कामती पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल झाला असून द्वारकेश सुर्यवंशी याला पोलीसांनी अटक केली आहे तर अन्य दोघे आरोपी फरार झाले आहेत.