‘ब्रॅन्ड इंडिया’चा वाजला डंका ! जगातील 7 वा सर्वाधिक मुल्यवान देश बनला भारत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मौल्यवान देशांच्या यादीत म्हणजेच (World Most Valuable Nation Brands) ब्रॅंड यादीत भारताचे स्थान उंचावले आहे. या यादीत टॉप 10 देशात भारताच्या ब्रॅँड व्हॅल्यू 18 टक्क्यांनी वाढली आहे. भारताचे ब्रॅंड मूल्य वाढून आता 2,56,200 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 181 लाख कोटी रुपये झाले आहे.

ब्रॅंड फायनान्स कडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीत अमेरिका टॉप वर आहे. देशाची ब्रॅंड व्हॅल्यू देशातील 5 वर्षात ब्रँड्स प्राॅडक्टच्या विक्रीच्या प्रमाणावरुन काढण्यात येते. तर देशाचा जीडीपी एकूण उत्पन्नावरुन निश्चित केला जातो.

जगातील 10 सर्वाधिक मूल्यवान ब्रॅंड असलेल्या देशांची यादी
अमेरिका जगातील सर्वाधिक मूल्यवान ब्रॅंड असलेला देश आहे. याचे अधिकांश मूल्य देशाच्या अर्थकारणातून येते. याशिवाय सर्वोच्च स्तराची शिक्षण व्यवस्था आणि सॉफ्टवेअर उद्योगांशिवाय मनोरंजन उद्योगाचा देखील यातील वाटा महत्वाचा आहे.

1) या यादीत टॉप आहे ती अमेरिका, अमेरिकेची ब्रॅंड व्हॅल्यू एका वर्षात 7.1 टक्क्यांनी वाढून 27,75,100 कोटी डॉलर (1970 लाख कोटी रुपये) झाली.

2. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, चीनची ब्रॅंड व्हॅल्यू एका वर्षात 40 टक्क्यांनी वाढली, 19,48,600 कोटी डॉलर (1383 लाख कोटी रुपये) झाली.

3. या यादीत तिसऱ्या स्थानी आहे जर्मनी, जर्मनीची ब्रॅंड व्हॅल्यू एका वर्षात 5.6 टक्कांनी कमी होऊन 4,85,500 कोटी डॉलर (344 लाख कोटी रुपये) झाली.

4. चौथ्या स्थानी आहे जपान, जपानचे रँकिंग एकने आणखी उत्तम झाले. पहिल्यांदा जपान 5 स्थानी होते मात्र या वर्षी ब्रॅंड व्हॅल्यू 26 टक्क्यांनी वाढून 4,53,300 कोटी डॉलर (321 लाख कोटी रुपये) झाली.

5. पाचव्या स्थानी आहे यूके. त्यांची ब्रॅंड व्हॅल्यू एक वर्षात 2.6 टक्क्यांनी वाढून 3,85,100 कोटी डॉलर (273 लाख कोटी रुपये) झाले.

6. सहाव्या क्रमांकावर आहे फ्रान्स. फ्रान्सची ब्रॅंड व्हॅल्यू एक वर्षात 4 टक्क्यांना वाढून 3,09,700 कोटी डॉलर (273 लाख कोटी रुपये) झाली.

7. भारताचा सातवा क्रमांक आहे. एका वर्षात भारताची ब्रॅंड व्हॅल्यू वाढून आता 2,56,200 कोटी डॉलर (181 लाख कोटी रुपये) झाली मागील वर्षी भारत या यादीत 9 व्या स्थानी होता. आता भारत 7 व्या स्थानी आहे.

8. कॅनडा 8 व्या क्रमांकावर आहे. कॅनडाची ब्रॅंड व्हॅल्यू एक वर्षात 2 टक्क्यांना कमी होऊन 2,18,300 कोटी डॉलर (155 लाख कोटी रुपये) झाली.

9. या यादीत 9 व्या स्थानी आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाची ब्रॅंड व्हॅल्यू एका वर्षात 7 टक्क्यांनी वाढून 2,31,500 कोटी डॉलर झाले.

10. या यादीत 10 व्या स्थानी इटली आहे. इटलीची ब्रॅंड व्हॅल्यू एका वर्षात 4.6 टक्क्यांनी वाढून 2,11,000 कोटी डॉलर (149 लाख कोटी रुपये) राहिले.

Visit : Policenama.com