महिलेवर गाेळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी जिगरबाज निरीक्षकाने जीवाची परवा ही केली नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  चंदननगरमध्ये आज (बुधवार) सकाळी हल्लेखोरांनी एकता  ब्रिजेस भाटी (वय ३८) या महिलेवर गोळ्या घालून त्यांची हत्या केली. या आरोपींचा शोध गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी घते असताना आरोपी झेलम एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली हाेती. गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक गजानन पवार हे आरोपींना पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले असता, आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये गजानन पवार यांना दोन जखमा झाल्या आहेत. मात्र, जिगरबाज पोलीस निरक्षक गजानन पवार यांनी जिवाची परवा न करता देखील केली नाही.

शिवलाल बाबुलाल राव (वय-३९ रा. राजस्थान) आणि मुकेश जगराम राव  यांना पाेलीसांनी ताब्यात घेतले अाहे. शिवलाल बाबुलाल राव याला पुणे रेल्वे स्थानकाजवळ पकडण्यात आले. तर त्याच्या दुसऱ्या साथिदार मुकेश जगराम राव याला  झेलम एक्सप्रेसमधून विना तिकीट प्रवास करताना रेल्वे पोलिसांनी दौंड येथे पकडले.

चंदननगर येथील इंद्रयणी गृहरचना सोसायटीत राहणाऱ्या एकता भाटी यांच्यावर सकाळी  तरुणांनी घरात घुसून गोळीबार केला होता. यात भाटी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातील आरोपी हे झेलम एक्सप्रेसने पळून चालले असल्याची माहिती मिळाली. युनिट दोनचे पोलीस निरीक्षक पवार हे सहकाऱ्यांसह आरोपींचा प्लॅटफॉर्म ३ वर शोध घेत होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना पाहताच पळ काढला. यातील एका आरोपीने पवार यांच्यावर गोळी झाडली. पवारांच्या शरीरावर दाेन जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  पवारांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी एका आरोपीला पकडले तर रेल्वे पोलिसांनी आणखी एका आरोपीला दौड येथे पकडले. पुणे शहरात एकाच दिवशी तीन गोळीबाराच्या घटना घडल्या असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, गुन्हे शाखेचे अपर अायुक्त प्रदिप देशपांडे,  पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.जिगरबाज पोलीस निरक्षक गजानन पवार यांनी  जिवाची परवा न करता देखील एकता भाटी यांच्या खुनाचा गुन्हा काही तासातच उघड केला.