Breastfeeding | सना खानने महिनाभरात असे कमी केले 15 किलो वजन, ‘न्‍यू मॉम’ अवलंबू शकतात ‘ही’ सोपी पद्धत

नवी दिल्ली : Breastfeeding | अभिनेत्री ते अध्यात्म असा प्रवास करणारी सना खान सध्या तिच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे. तिने ५ जुलै रोजी मुलाला जन्म दिला होता. न्यू मॉम बनलेली सना सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि फॅमिली फोटो शेअर करत असते. तिने ब्रेस्टफीडिंग संबंधी अनेक अनुभव शेअर केले आहेत (Sana Khan Revealed Weight Lose Journey).

तिचे मत आहे की, फीडिंगमुळे तिला खूप फायदा झाला आहे. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान वल्र्ड ब्रेस्टफीडिंग वीक साजरा केला जातो. वल्र्ड ब्रेस्टफीडिंग वीकनिमित्त तिने सांगितले की, बाळाला ब्रेस्टफीडिंग केल्याने बाळ आणि तिच्यात घट्ट नाते निर्माण झाले आहे. (Breastfeeding)

ब्रेस्टफीडिंग एक जादुई अनुभव

सना खान म्हणाली की, मुलाला फीडिंग करणे ही जगातील सर्वात सुंदर भावनांपैकी एक आहे. हे तुम्हाला मुलाशी आणखी जोडते. हा खरोखर एक जादुई अनुभव आहे.

सना म्हणाली की, जेव्हा मी ब्रेस्टफीडिंगला सुरुवात केली तेव्हा मला वाटायचे की मी इतकी वर्षे या शरीरात कशी राहते, आई बनल्याने एक बदल होतो जो खूप वेगळा आहे. हा बदल देवाची स्तुती करण्यास प्रेरित करतो. सना खानने २०२० मध्ये मौलाना अनस सय्यदशी लग्न केले होते.

मुलांसाठी खूप महत्वाचे

३४ वर्षीय सना म्हणाली की, मला समजत नाही की काही माता बाळाला ब्रेस्टफीडिंग
करण्यापासून दूर का राहतात.
खरं तर ब्रेस्टफीडिंग बाळाच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे महत्त्वाचे आहे.
आईचे दूध हे सर्व गोष्टींमध्ये सर्वात फायदेशीर मानले जाते. ते बाळाच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे.
आईचे दूध मुलाचे पोट ठीक ठेवते, तसेच इम्युनिटी मजबूत करते.
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी याचा खूप फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

आपला अनुभव सांगताना सना म्हणाली, तिने एक महिन्यात ब्रेस्टफीडिंग करून सुमारे १२ किलो वजन कमी केले.
ती म्हणाली, हे पाहून मलाही आश्चर्य वाटले.
परंतु विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे की ब्रेस्टफीडिंगमुळे आईचे वजन कमी होऊ शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘अमित शहांनी अजित पवारांना विचारलं असेल,
बाबा रे 70,000 कोटींचं व्याज….’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा टोला