‘चिंता’, ‘भीती’, ‘ताण’ वाटत असेल ‘अशा’ पद्धतीनं श्वास घ्या, लगेच मिळेल आराम !

पोलीसनामा ऑनलाईन – एन्झायटी (Anxiety) म्हणजेच कशाची तरी भीती वाटणं किंवा ताण-तणाव आल्यानं अस्वस्थ वाटणं. अनेकांना कधी कधी असा त्रास जाणवत असतो. तसं पाहिलं तर हे सामान्य आहे. जर हे गंभीर असेल म्हणजेच एखाद्याला Anxiety Disorder सारखी समस्या असेल तर त्याचा दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होतो.

आयुष्यात जेव्हा मोठं संकट येतं किंवा एखाद्या परिस्थितीमुळं माणूस खचून जातो. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करतो. याचाच ताण माणसाच्या मन आणि मेंदूवर पडतो. यामुळं माणूस नैराश्येच्या गर्तेत जातो. आज आपण एन्झायटी (Anxiety)ची लक्षणं आणि यावर कशा प्रकारे मात केली जाते हे पाहणार आहोत.

एन्झायटीची लक्षणं –

1) रक्तदाब म्हणजेच बीपी वाढणे
2) अति चिंता किंवा अस्थिरता
3) मळमळ
4) चिडचिड
5) एकाग्रतेची कमतरता
6) निद्रानाश म्हणजेच स्लीप डिसऑर्डर
7) पॅनिक म्हणजेच अस्वस्थ होणं
8)

जर तुम्हाला एन्झायटी डिसरऑर्डर नसेल म्हणजेच ही सामान्य एन्झायटी असेल तर तुम्ही यातून लवकर बाहेर पडू शकता. मनात भीती, ताण, चिंता असं काही वाटत असेल आणि यामुळं जर अवस्थ वाटत असेल तर काही श्वसनाच्या पद्धतीनं तुम्हाला रिलॅक्स वाटू शकतं. या पद्धती पुढीलप्रमाणे-

1) साधी श्वसन पद्धत – जसं आपण नेहमी श्वास घेतो आणि सोडतो तसंच करायचं आहे. खांदे रिलॅक्स ठेवून श्वास घेणं आणि सोडणं सुरू ठेवायाचं आहे. श्वास घेताना पोट आत घ्या. परंतु हे करताना जबडाही सामान्य ठेवा. जर काही मिनिटं तुम्ही हा आराम केला तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

2) दीर्घ श्वास पद्धत – यासाठी तुम्हाला आधी गुडघ्यावर बसायचं आहे. यानंतर हात गुडघ्यांपर्यंत लांब करून केवळ नाकानं श्वास घ्यायचा आहे. परंतु श्वास सोडताना मात्र तो तोडावाटे सोडायचा आहे. श्वास सोडतानाच तुम्हाला हा असा उच्चार जोरात करायचा आहे. शक्य तितकं तोंड उघडून तुमची जीभ हनुवटीच्या दिशेनं ठेवण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम करताना तुम्हाला सर्व लक्ष हे कपाळाच्या मध्यभागी केंद्रीत करायचं आहे.

3) प्राणायम – योगा ही खूप प्राचीन व्यायामपद्धती आहे. यात श्वसनाचे विविध प्रकार आणि प्राणायमच्याही विविध पद्धती दिल्या आहेत. भ्रामरी प्रणायम ही त्यातीलच एक पद्धत आहे. यात आपले डोळे आणि कान बंद करून आपला श्वास पूर्ण आत घेऊन हळूहळू सोडायचा आहे.

4) नाडीशोधन प्राणायम – यात एक नाकपुडी बंद करून दुसऱ्यानं श्वास घ्यायाचा आहे आणि जी नाकपुडी बंद होती तिनं श्वास सोडायचा आहे. पुन्हा जिनं श्वास सोडला होता तिनं घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीनं सोडायचा आहे किमान 5 वेळा जरी तुम्ही असं केलं तरीही तुम्हाला आराम मिळेल.