उद्योग धोरण मंजूर करून घेण्यासाठी दलाली ; राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुढील पाच वर्षांसाठी राज्य सरकारने नवे औद्योगिक धोरण जाहीर केलं आहे. या नव्या धोरणामुळे राज्यात तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन सुमारे ४० लाख रोजगारांची निर्मिती केली जाईल, असे उद्दिष्ट सरकारद्वारे ठेवण्यात आले. त्यावर राज्य सरकारने नवे उद्योग धोरण मंजूर करून घेण्यासाठी दलाली केली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांच्या दावोस दौऱ्याचा खर्च ७ कोटी दाखवून लाचखोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचा खर्च १ कोटी होता. मग सचिवांना ७ कोटी का लागले, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

१ ते २५ जानेवारीदरम्यान हा दौरा झाला असताना सर्व बिले २१ तारखेची आहेत, असाही आरोप मलिक यांनी केला. उद्योग धोरण मंजूर करून घेण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून दिली गेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशी करण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, या नव्या औद्योगिक धोरणामुळे राज्यात परदेशी गुंतवणुकीचं प्रमाण वाढेल. राज्याची अर्थव्यवस्था शंभर अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला होता. त्यावर नवाब मलिक यांनी आक्षेप घेत आरोप केले. मात्र शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

ह्याही बातम्या वाचा

करण जोहरच्या ‘या’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

राहुल गांधींचा भारतीय हवाई दलापेक्षा पाकिस्तानवर अधिक विश्वास

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तयारीसंदर्भात ‘स्वीप’आणि ‘पीडब्ल्यूडी’ सुकाणू समितीची बैठक संपन्न

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई

जम्मूत ग्रेनेड हल्ला करणाऱ्याला अटक