Brief Emotion Charge | शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या रडण्यावर लावला जादा ‘चार्ज’, वायरल झाले बिलाचे ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Brief Emotion Charge | शस्त्रक्रिया एक असा शब्द आहे जो कोणत्याही व्यक्तीमध्ये भिती निर्माण करतो. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया असली तरी मनुष्यामध्ये त्या स्थितीतून जाताना अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतात. मनुष्य घाबरतो, रडतो सुद्धा आणि तणावात सुद्धा दिसतो. मात्र, अमेरिकेत एक महिला जेव्हा तिळ काढण्याची शस्त्रक्रिया (mole removal operation) करण्यासाठी गेली असताना या दरम्यान तिच्या डोळ्यातून अश्रू आल्याने तिच्यावर रडण्याचा चार्ज (Brief Emotion Charge) लावण्यात आला.

अमेरिकेतील एका महिलेने दावा केला आहे की, शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या रडण्यावर डॉक्टरांनी जादा चार्ज लावला (A woman in the United States has claimed that doctors charged her for crying during surgery). तिने पुरावा म्हणून बिलाचे छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर केले. या ट्विटमध्ये 11 डॉलरचे शुल्क रडण्यावर लावलेले आहे. महिलेच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे आणि पाहता-पाहता हे ट्विट सोशल मीडियावर वेगाने वायरल झाले.

महिलेला लावला ब्रीफ इमोशन चार्ज (Brief Emotion Charge)
सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेवर मोठी चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये युजर्स आपले विचार शेयर करत आहेत. ही घटना सांगणार्‍या महिलेचे नाव मिज (Miz) आहे. मिजने मेडिकल बिल (medical bill) शेयर केले, जे तिला तिळ काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर सोपवण्यात आले होते.

या बिलात तिळ काढण्याची शस्त्रक्रिया एकुण 234 डॉलरमध्ये झाल्याचे दिसत आहे.
बिलात फिजिशियन सर्व्हिस, सर्जिकल सर्व्हिससह ब्रीफ इमोशन चार्ज सुद्धा लावला आहे.
हा चार्ज सर्जरीच्यावेळी रडल्याने लावला आहे. जो मिजने भरला आहे.

 

1.50 लोकांनी मिजचे ट्विट केले लाईक

महिलेच्या हे ट्विट आतापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केले आहे.
तर 1.50 लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

Web Title :-  Brief Emotion Charge | extra charge imposed for crying during surgery woman s share receipt goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | 54 रुपयांचा शेयर झाला 879 रुपयांचा, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 लाख; तुम्ही खरेदी केला आहे का?

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरुच, आता 26823 रुपयात मिळतंय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

Artificial Kidney | ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार ‘ही’ कृत्रिम किडनी, बंद होणार डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटचे त्रास; जाणून घ्या