हॅलो आणि शेअर चॅटची नवीन ‘ऑफर’, नव्या युजर्संना ‘अ‍ॅड’ केल्यावर मिळणार ‘एवढी’ रक्‍कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये सोशलमिडिया कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा पहायला मिळते आहे. भारतीय सोशलमिडीया कंपनी शेअर चॅट आणि या कंपनीची स्पर्धक कंपनी हॅलो या दोन कंपन्यांमध्ये युजर वाढवण्यासाठी जबरदस्त स्पर्धा लागली आहे. या दोन्ही कंपन्या युजरला आकर्षीत करण्यासाठी युजर्सला पैसे देत आहेत. युजर्सना हॅलो अँपकडून साइनअप केल्यानंतर १० रुपये आणि शेअर चॅटकडून १५ रुपये पेटीएम अकाउंटवर देण्यात येणार आहेत. दोन्ही कंपन्या मातृभाषेत व्यक्त होणाऱ्या नवीन युजर्सना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

चिनी कंपनी हॅलो अँप आणि भारतीय कंपनी शेअर चॅट यांमध्ये स्पर्धा
हॅलो अॅप चीनचे असून या हॅलोचे ५ कोटी युजर्स आहेत तर शेअर चॅटचे ४.५ कोटी युजर्स आहेत. हॅलो अॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आमच्या युजर्सची वाढ नैसर्गिकपणे आणि वर्ल्ड ऑफ माऊथ पब्लिसिटीमुळे झाली आहे. आम्ही युजरमध्ये वाढ करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करत आहोत. इन्व्हाईट अँड अर्न हा त्याचाच एक भाग आहे. युजर्सची एंगेजमेंट वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स खूप काही सांगतात, जाणून घ्या

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव

वंचित बहुजन आघाडीला खिंडार, लक्ष्मण मानेंनी केले गंभीर आरोप