BSNL ‘या’ ग्राहकांना देतंय 4 महिन्यापर्यंत फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) भारत फायबर आणि डिजिटल सबस्क्रायबर लाईन (DSL) ग्राहकांना चार महिन्यांसाठी ब्रॉडबँड सर्व्हिस फ्री देत आहे. सोबतच या ऑफरचा फायदा देशभरातील BSNL लँडलाईन आणि ब्रॉडबँड ओव्हर Wi-Fi (BBoWiFi) सबस्क्रायबर्ससाठी सुद्धा दिला जात आहे.

TelecomTalk च्या एका रिपोर्टनुसार, BSNL आपल्या भारत फायबर, DSL, लँडलाईन आणि BBoWiFi ग्राहकांना 36 महिन्यांचे भाडे एकदाच दिल्यास चार महिन्यांसाठी फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस देत आहे. म्हणजे या ग्राहकांना 36 महिन्यांपर्यंत सर्व्हिस खरेदीवर एकुण 40 महिन्याची सर्व्हिस मिळेल.

सोबतच BSNL आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना 24 महिन्याची सर्व्हिस अ‍ॅडव्हान्समध्ये खरेदी केल्यास तीन महिने फ्री सर्व्हिस सुद्धा ऑफर करत आहे.
अशाप्रकार 12 महिन्याची सर्व्हिस अ‍ॅडव्हान्समध्ये खरेदी केल्यास ग्राहकांना एक महिन्याची सेवा फ्रीमध्ये मिळेल.

ग्राहक या ऑफरचा फायदा टोल फ्री नंबर 1800003451500 वर फोन करून किंवा जवळच्या कस्टमर केयर सेंटरवर जाऊन घेऊ शकतात.
ही फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस ऑफर सर्वप्रथम मागील वर्षी महाराष्ट्रात सादर करण्यात आली होती. मात्र, आता सर्व सर्कलमध्ये ती उपलब्ध आहे.

KeralaTelecom च्या रिपोर्टनुसार, करण्यात आलेला बदल सर्व भारत फायबर प्लानवर लागू होईल.
प्लानची किंमत 449 रुपयांपासून सुरू होऊन 1,499 रुपयांपर्यंत आहे. सोबतच Disney+Hotstar Premium प्लान बंद केला आहे.

 

Web Title : BSNL | bsnl offers up to 4 months of free broadband service to these subscribers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan | लवकर दुरूस्त करा आपले नाव आणि आधारसंबंधी चुका, ‘या’ दिवशी येईल PM Kisan चा 10वा हप्ता

Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही?, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं…

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आरक्षणाबाबत मोठं विधान, म्हणाले…