BSNL Plan Offers | बीएसएनएलने आणला सगळ्यात स्वस्त डाटा पॅक बाजारात, जाणून घ्या किमती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BSNL Plan Offers | तुम्ही दर थोड्या दिवसांनी तुमच्या मोबाइलला रिचार्ज करून कंटाळला आहात का? तुमच्या मोबाइलचा एकूण वर्षाचा खर्च 3 हजारांच्या वरती जातोय का? तुम्हाला पर्याय हवाय का? जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील, तर भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने तुमच्यासाठी एक उत्कृष्ट डाटा प्लॅन घेऊन आले आहे. बीएसएनएल (BSNL Plan Offers) घेऊन आले आहे 1515 रुपयांचा प्लॅन. हा प्लॅन तुम्हाला तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी दर दिवसाला 2 जीबी डाटा देतो.

 

भारताचे मोबाइल नेटवर्क मार्केट सध्या जिओ, एयरटेल आणि व्ही या तीन कंपन्यांनी काबीज केले आहे. तिन्हीही खासगी कंपन्या असल्याने त्यांचे डाटा पॅक स्वस्त आहेत. पण, बीएसएनएलने त्यांच्या विरोधात कंबर कसली असून त्यांनी अगदी 30 दिवसांपासून ते 365 दिवस वैधता असलेले प्लॅन्स बाजारात आणले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे दोन प्लॅन म्हणजे, 1515 रुपयांचा 365 दिवस वैधता असलेला पॅक आणि 1499 रुपयांचा 336 दिवस वैधता असलेला पॅक.

 

1515 च्या प्लानमध्ये दररोज 2 GB हायस्पीड डाटा उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला एका वर्षासाठी 730 GB डाटा मिळतो, तर दैनिक डाटा मर्यादा संपल्यानंतर हा वेग 40 Kbps पर्यंत कमी होतो. पण या प्लॅनमध्ये एसएमएसची सुविधा उपलब्ध नाही, तर 1499 चा तुम्हाला 336 दिवसांची वैधता देतो. पण, यात तुम्हाला रोज 100 एसएमएस आणि 24 जीबी डाटा उपलब्ध मिळेल. हा प्लान दुय्यम सिमसाठी वापरला जाऊ शकतो.

 

Web Title :- BSNL Plan Offers | this bsnl plan offers 365 days validity along with other benefits see price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Manmohan Hospitalized | हार्ट अटॅक आल्याने सिने निर्माते नितीन मनमोहन रुग्णालयात; प्रकृती चिंताजनक

Mumbai Gangrape | धक्कादायक ! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके

Uddhav Thackeray | ‘महाविकास’ सरकार पाडण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्‍याबाबत शिवसेनेने केला मोठा दावा,