Nitin Manmohan Hospitalized | हार्ट अटॅक आल्याने सिने निर्माते नितीन मनमोहन रुग्णालयात; प्रकृती चिंताजनक

पोलीसनामा ऑनलाइन : Nitin Manmohan Hospitalized | हिंदी सिने सृष्टीतील लोकप्रिय सिने निर्माते नितीन मनमोहन यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन यांनी ‘दस’, ‘लाडला’ आणि ‘बोल राधा बोल’ या सिनेमांची निर्मिती केली आहे. (Nitin Manmohan Hospitalized)
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मनमोहन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असले तरी त्यांचा धोका अजून टळलेला नाही. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांची टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मनमोहन यांचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. ते लवकर बरे व्हावे म्हणून सेलिब्रिटींसह चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत.
मनमोहन यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच अनेक कलाकारांना त्यांनी अभिनयाची
संधी दिली आहे. नितीन मनमोहन यांच्या वडिलांनीदेखील ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’सारख्या अनेक सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारली आहे.
Web Title :- Nitin Manmohan Hospitalized | nitin manmohan popular film maker nitin manmohan has been admitted to the hospital due to a heart attack
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Prices | तज्ज्ञांचा अंदाज ठरत आहे खरा; जाणून घ्या सोन्याचे सध्याचे दर
Delnaaz Irani | शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील खंत