BSNL Recharge Plan | कोणतेही लिमिट नाही, 60 दिवसांसाठी मिळेल 100GB डेटा; फ्री कॉलिंग आणि खुपकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL आपल्या ग्राहकांना अनेक Prepaid Recharge Plan ऑफर करते. जर तुम्ही 60 दिवसांची वैधता असलेला प्लान शोधत असाल तर बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये (BSNL Recharge Plan) अशा अनेक योजना उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये 60 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह अनेक सेवा उपलब्ध आहेत. (BSNL Recharge Plan)

 

कंपनी 447 रुपयांची योजना ऑफर करते, ज्यामध्ये यूजरला Eros Now चे सबस्क्रिप्शन मिळते. यासोबतच या प्लानमध्ये BSNL Tunes ची सुविधा देखील उपलब्ध आहे. Recharge Plan मध्ये, वापरकर्त्यांना 100GB डेटासह दररोज 100 एसएमएस मिळतात.

 

तसेच, BSNL प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. FUP मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, यूजरला 80Kbps च्या स्पीडने डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 100जीबी डेटा मिळत असल्याने, तुम्हाला दररोज डेटाची काळजी करण्याची गरज नाही. म्हणजेच, या प्लानमध्ये यूजर्सला कोणत्याही डेली लिमिटशिवाय डेटा मिळतो.

हा आहे स्वस्त पर्याय
जर तुम्ही परवडणारा प्लान शोधत असाल, तर बीएसएनएलचा 247 रुपयांचा प्लान हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, या प्लॅनमध्ये 447 रुपयांच्या तुलनेत केवळ निम्मे फायदेच मिळतात. 247 रुपयांमध्ये बीएसएनएल ग्राहकांना एकूण 50जी डेटा मिळतो, जो 30 दिवसांच्या वैधतेसाठी असेल.

 

या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. प्रीपेड रिचार्जमध्ये, यूजरला Eros Now आणि BSNL Tune चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. सध्या, 60 दिवस आणि 30 दिवसांची वैधता असलेले हे दोन प्लॅन कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये उत्तम पर्याय आहेत.

 

यामध्ये युजर्सना केवळ डेटाच मिळत नाही तर फ्री व्हॉईस कॉलिंग, इरॉस नाऊ सबस्क्रिप्शन आणि बीएसएनएल ट्यूनचाही फायदा मिळतो.
तुम्हाला कोणत्याही दैनिक मर्यादेशिवाय प्रीपेड रिचार्ज प्लॅन हवा असल्यास, बीएसएनएल यूजरसाठी हे सर्वोत्तम पर्याय आहेत.

 

Web Title :- BSNL Recharge Plan | bsnl recharge plan rs 447 with 60 days validity and free calling details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO Interest Rate | पुढील महिन्यात मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, 24 कोटी लोकांना मिळेल खुशखबर?

 

Plant Based Meat | वेगन मीट म्हणजे काय? हे प्रत्यक्षातील मांसापेक्षा हेल्दी असते का?

 

Gangubai Kathiawadi | ‘ही’ने अलियाला देखील मागे टाकलं; ‘गंगूबाई काठियावाडी’ला देतेय टक्कर (व्हिडीओ)

 

Pimpri Corona Update | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी