Pimpri Corona Update | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) हद्दीमध्ये कोरोनाची लाट (Pimpri Corona Update) ओसरताना पाहायला मिळत आहे. शहरामध्ये झपाट्याने वाढलेली रुग्ण संख्या आता कमी होत आहे. रुग्ण कमी होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या अडीच हजारावर आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 185 नवीन रुग्णांचे (Pimpri Corona Update) निदान झाले आहे. तर 718 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover patient) केली आहे.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 764 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 185 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 114 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 718 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 50 हजार 674 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 2563 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 151 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2 हजार 412 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | Comfortable 185 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा