Plant Based Meat | वेगन मीट म्हणजे काय? हे प्रत्यक्षातील मांसापेक्षा हेल्दी असते का?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Plant Based Meat | शाकाहारी मांस (Vegan Meat) केवळ खर्‍या मांसासारखेच दिसत नाही तर चवीलाही तसेच असते. त्यामुळे त्याची खूप चर्चेत आहे. याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे, पॉवर कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Anushka Sharma and Virat Kohli) यांनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ‘ब्लू ट्राइब’ (Blue Tribe) नावाच्या वनस्पती-आधारित मांस (Plant Based Meat) ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे. दोघांनाही प्राण्यांवर प्रेम आहे आणि त्यांनी इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे याची घोषणा केली आहे.

 

भारतात शाकाहारी मांस (Vegetarian meat) ही प्रसिद्ध होत आहे. शाकाहारी मांसाचा उगम अमेरिकेत झाला असला तरी भारतासह जगभर त्याचा प्रसार वेगाने होत आहे. शाकाहारी मास म्हणजे काय? हे जाणून घेवूयात…

 

कशापासून बनते शाकाहारी मांस? (What Makes Vegetarian Meat)
शाकाहारी मांसाला आरोग्यदायी पर्याय मानले जाते. अशा प्रकारचे मांस बनवण्यासाठी वनस्पती प्रोटीन (Protein), गव्हाचे ग्लूटेन ( Wheat Gluten) किंवा सत्व (Cream), शेंगा (Legumes), सोया (Soya) आणि तांदूळ (Rice) यासारख्या साहित्याचा सर्वात जास्त वापर केला जातो.

 

शाकाहारी मांसाची चव आणि देखावा वाढवण्यासाठी नारळाचे तेल (Coconut Oil), मसाले (Spices) आणि बीटचा अर्क (Beet Extract) यासारख्या घटकांचा वापर केला जातो. हे घटक शाकाहारी मांस बनवण्यासाठी वापरले जात असल्याने, ते प्रत्याक्षातील मांसापेक्षा महाग आहे. (Plant Based Meat)

शाकाहारी मांस हेल्दी आहे का? (Is Vegetarian Meat Healthy)
शाकाहारी मांस कमी प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून खाणे आरोग्यदायी मानले जाते. जेव्हा आपण शाकाहारी मांसाच्या पौष्टिक सामग्रीबद्दल बोलतो तेव्हा त्यात जास्त प्रोटीन, कमी संतृप्त चरबी आणि कमी कोलेस्ट्रॉल असते. मात्र, शाकाहारी मांसामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ते चवदार बनते आणि शेल्फ लाईफ देखील वाढवते.

 

यामुळेच शाकाहारी मांस माफक प्रमाणात खाल्ले पाहिजे कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते,
ज्यामुळे स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

 

संतुलन ही गुरुकिल्ली
जर आपण शाकाहारी मांसाची खर्‍या मांसाशी तुलना केली तर शाकाहारी मांस आरोग्यदायी आहे यात शंका नाही,
परंतु मुख्य गोष्ट म्हणजे त्याचे प्रमाण आणि संतुलन राखणे ही किल्ली आहे. लक्षात ठेवा की तुम्ही या मांसाचे जास्त प्रमाणात सेवन करू शकत नाही.

 

Web Title :- Plant Based Meat | what is vegan or plant based meat is it healthier than the actual meat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Sugar Control Spice | शुगर कंट्रोल करण्यात अतिशय परिणामकारक आहेत मेथीदाणे, असा करा वापर

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात नव्या ‘कोरोना’ बाधितांची संख्या 500 च्या आत, जाणून घ्या आकडेवारी