आता मोदी सरकार करणार ‘BSNL’ला ‘रिचार्ज’, खासगी मोबाईल कंपन्यांना ‘टक्कर’ देण्याचा ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी क्षेत्रातील दूर संचार कंपनी BSNL सध्या तोट्याचा सामना करत आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की सरकार इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि अमेेरिकी अकाऊंटिंग फर्म मेसर्स Deloitte ची सेवा घेणार आहे आणि BSNL, MTNL चे रिस्ट्रक्चरिंगसाठी प्लॉन तयार करत आहे. लोकसभेत प्रश्नाला उत्तर देताना, रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, कंपन्याच्या शिफारसी आणि बोर्डाची मंजुरी यानंतर BSNL आणि MNTL ला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्लॉन तयार करण्यात येत आहे.

अनेकांनी या कंपन्याच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. सर्व कंपन्या 4 जी सेवा देत असताना देखील BSNL अजूनही 4 जी सेवा देत नाही, त्यामुळे कंपनीपासून अनेक ग्राहक दूरावले आहेत. रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की जेव्हा 4 जी स्पेक्ट्रमचे वाटप होत होते तेव्हा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या नव्हत्या. याला कारण हे होते की यातून भ्रम निर्माण झाला असता की सरकार PSU ला सहाय्य करत आहे आणि दुसऱ्या कंपन्याना न्याय मिळला नसता. परंतू आता बाजार आणि स्पर्धेचा विचार करता आम्ही देखील 4 जी आणण्याचा विचार करू.

रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की BSNL, MTNL च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च खासगी कंपन्यांपेक्षा आधिक आहे. त्यांनी सांगितले की BSNL च्या स्फाटचा खर्च एकूण खर्चाच्या 75.06 टक्के आहे, तर MTNL चा खर्च 87.45 टक्के आहे. तर खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च 2 ते 5 टक्के आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत लिखित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मोबाईल क्षेत्रात बरीच स्पर्धा असल्याने BSNL, MTNL यांना होणारे त्रास वाढला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यावर होणारा अधिक खर्च आणि 4 जी सेवेची कमी यामुळे डेटा केंद्रात बाजारात सरकारी कंपन्याना नुकसान सोसावे लागत आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक