केंद्र सरकार ‘मुद्रा’ लोनची ‘मर्यादा’ वाढवणार, ३० कोटी लोकांना ‘फायदा’ मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आणि लोकसभा अध्यक्षांनी पदभार स्विकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अभिभाषण केले. या अभिभाषणात त्यांनी मोदी सरकार २. ० चा अजेंडा देशासमोर मांडला. त्यामध्ये त्यांनी ‘पंतप्रधान मुद्रा योजने’च्या अंतर्गत एक प्रस्तावाची माहिती दिली. याचा फायदा जवळपास ३० कोटी लोकांना होणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत, स्वयंरोजगारासाठी जवळपास १९ कोटी लोकांना कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेचा आता विस्तार करण्यात येणार असून ३० कोटी लोकांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच व्यापाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचे कर्ज गॅरंटीशिवाय देण्याचीही योजना आणली जाईल.

मुद्रा योजनेचा उद्देश –

देशातील गृह आणि लघू उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकारने एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेला सूरूवात केली होती. हे कर्ज नॉन कॉर्पोरेट लहान व्यवसायासाठी दिले जाते. हे कर्ज आपण वाणिज्य बॅंक, ग्रामीण बँक, सहकारी बँक, मायक्रोफायनांस(सूक्ष्म-वित्त) संस्था आणि आर्थिक कंपनीमध्ये अर्ज करून मिळवु शकता.

स्वयंरोजगारासाठी लघु उद्योगांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. कोणत्याही व्यक्तीला व्यवसाय सुरु करायचा असेल तर या योजनेअंतर्गत कर्ज मिळेल. मुद्रा लोन अंतर्गत ५० हजारांपासून ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जाला तीन श्रेणीत विभाजित केले आहे. या योजनेबद्दल http://www.mudra.org.in/ या वेबसाईटवर अधिक माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स