अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२०-२१ चा देशाचा अर्थसंकल्प सादर केला, याबाबत अमृता फडणवीस यांनी निर्मला सीतारामन यांचे कौतुक केले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या गाण्यामुळे तर कधी त्यांच्या राजकीय टोलेबाजीमुळे या कारणामुळे सोशल मीडियात चर्चेत असतात.आता अमृता फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या एका प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियात त्यांना आता (Amruta Fadnavis Troll on Twitter) ट्रोल केलं जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पाचं भाजपा नेत्यांनी कौतुक केले तसेच अमृता फडणवीस यांनीही निर्मला सीतारामन यांचे कौतुक करताना मागील १०० वर्षात कधीही पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचे आभार मानले, तर कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे सर्व देश आपल्याकडून शिकतोय असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांना सोशल मीडियात चांगलेच ट्रोल करण्यात आले, स्वातंत्र्याला १५० वर्ष तरी पूर्ण झाली आहेत का? देशाला ७३ वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आणि गेल्या १०० वर्षाच्या बजेटबद्दल बोलतोय अशा शब्दात नेटिझन्सने नाराजी व्यक्त केली. तर एका युजरने सांगितले की, स्वतंत्र हिंदुस्तानाचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला गेला, देशाला स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्ष झालीत असं सांगितले.