Budget 2021, Infrastructure : मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर, 1100 KM हायवेची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प टॅबच्या माध्यमातून सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रेल्वे डेडिकेटेड फ्रन्ट कॉरिडोअर, NHAI चे टोल रोड आणि एअरपोर्टसारख्या ठिकाणांना असेट मॉनिटायझेशन मॅनेजमेंटच्या अंतर्गत आणणार असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी जुन्या गाड्यांना स्क्रॅप केलं जाणार असून यामुळे प्रदुषण नियंत्रणात येईल असे त्यांनी म्हटले.

भारतमाला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 3 हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. 8 हजार किलोमीटरपर्यंतचं कंत्राट मार्च महिन्यापर्यंत देण्यात येईल. रोड इन्फ्रा आणि इकॉनॉमिक कॉरिडोअरवर काम सुरु आहे. सध्या तामिळनाडूत 3 हजार 500 किमीचे रस्ते तयार होत आहे. यामध्ये मदुरै-कोल्लम कॉरिडोअरचा समावेश आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

केरळमध्ये 1100 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी 65 हजार कोटी रुपये खर्च होती. मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोअरदेखील याचाच भाग असेल. तर 6500 किमी लांबीचा महामार्ग बंगालमध्ये तयार केला जाणार आहे. यावर 25 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. यामध्ये कोलकाता-सिलिगुडी रस्त्यांची डागडुजीही करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारमन यांनी सांगितले.