Budget 2021 : तिजोरी भरण्यासाठी सरकार काय-काय विकणार ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या वित्तीय वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. कोरोना संकटात सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाकडून लोकांना अनेक अपेक्षा आहेत. त्यातच कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली. तसेच लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने सरकारला मिळणारा महसूल कमी झाला आहे. एकीकडे महसूल कमी झाला आहे तर दुसरीकडे कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रावरील खर्च वाढला आहे. अशातच जनतेला दिलासा देताना महसूल वाढवण्याचे आव्हान अर्थमंत्र्यासमोर होतं.

1.75 लाख कोटी निर्गुंतवणुक उभारण्याचे उद्दिष्ट
मोदी सरकारने उत्पन्न वाढवण्यासाठी 201-22 या वित्तीय वर्षात पावणे दोन लाख कोटी रुपये निर्गुंतवणुक उभारण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात हे ध्येय बरचं दूर आहे. चालू वित्तीय वर्ष संपण्यास केवळ दोन महिने राहिले आहे. त्यामुळे चालू वर्षात सरकार निर्गुंतवणुकीचं लक्ष गाठण्याची शक्यता कमी आहे.

BPCL, SCI, एअर इंडीयातील गुंतवणूक कमी करणार
सरकारने नव्या आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रुपये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे हे उद्दिष्ट 35 हजार कोटींनी कमी आहे. पुढील आर्थिक वर्षात सरकार बीपीसीएल, एअर इंडिया, कॉनकोर, एससीआयमधील गुंतवणूक कमी करणार आहे. एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षात आणण्याची सरकारची योजना आहे. शेअर बाजारातील तेजी पाहता सरकार सीपीएसईमधील हिस्सा ऑफर फॉर सेलच्या (OFS) माध्यमातून विकू शकते. तसेच खासगीकरणाच्या अनेक योजना 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे.