‘चांद्रयान – २’ चे बजेट ९७८ कोटी, हॉलिवूडच्या सिनेमांचे ‘बजेट’ यापेक्षा ‘दुप्पट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) इसरो ने सोमवारी म्हणजेच आज चांद्रयान – २ चे प्रक्षेपण केले, त्यानंतर आता भारताच्या अंतरिक्ष मोहिमेत मानाचा तुरा रोवला आहे. या मोहिमेची सर्वात विशेष बाब म्हणजे यात फक्त ९७८ लाख रुपये खर्च करण्यात आला. जे की एखाद्या हॉलिवूड सिनेमापेक्षा अत्यंत कमी आहे. नुकताच प्रदर्शित झालेला एवेंजर्स एंडगेम या सिनेमाचे बजेट २,४४३ कोटी रुपये होते. या बजेट मध्ये भारत दोन चांद्रयान पाठवू शकतो.

हॉलिवूड सिनेमाचे बजेट याहून दुप्पट –

चांद्रयान – २ वर करण्यात आलेले खर्च ९७८ कोटी रुपयांमधील ६०३ कोटी रुपये मोहिमेसाठी वापरण्यात आले. तर लॉन्चिंगसाठी ३७५ कोटी रुपये खर्च करण्यात आला. हे एकूण बजेट देखील चारही एवेजर्सच्या सिनेमांपेक्षा चांद्रयान – २ मोहिमेंचे बजेट कमी आहे. The Avengers १,५१७ कोटी रुपये बजेट होते. Averner Infinity war चे बजेट २,१७९ कोटी रुपये होते. Averngers – age of ultron चे बजेट २,५१७ कोटी रुपये होते.

चांद्रयान – २ मोहिम चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर लॅन्डिंग करण्यासाठी हे भारताचे पहिली अंतराळ मोहिम आहे. चंद्राच्या जमीनीची तपासणी करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही मोहिम १५ जुलैलाच लॉन्च होणार होती. परंतू तांत्रिक अडचणींनी हे लॉन्चिंग रोखण्यात आले होते. या मोहिमेनंतर आता भारत चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करणाऱ्या देशांच्या क्लबमध्ये सहभागी होईल. यात आधी रशिया, अमेरिका, चीन यांच्या समावेश आहे त्या रंगेत आता भारत देखील जाऊन बसेल.

एवढी स्वस्त मोहिम राबवून चांद्रयान – २ लॉन्च केल्यामुळे भारताची मान उंचावली आहे, या मोहिमेमुळे जगभरात भारताचे कौतूक करण्यात येत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –