Coronavirus : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 113 नवे पॉझिटिव्ह

बुलडाणा,पोलीसनामा ऑनलाइन : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 540 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 427 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 113 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 96 व रॅपिड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 354 तर रॅपिड टेस्टमधील 73 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 427 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : लोणार शहर : 1, लोणार तालुका: पाडळी शिंदे 1, सावरगाव मुंढे 2, पळसखेड 6, रायगाव 1, मांडवा 1, सुलतानपूर 1, मेहकर शहर: 4, मेहकर तालुका : पिं. माळी 1, कळंबेश्वर 1, मोळा 1, डोणगाव 1, सिंदखेड राजा तालुका : पिंपळगाव सोनारा 1, पिंपळखुटा 1, दुसर बीड 2, सिंदखेड राजा शहर : 1, दे. राजा तालुका : दे. मही 3, सातेगाव 1, नागण गाव 2, पिंपलखुटा 1, रोहणा 3, दे. राजा शहर : 3, चिखली तालुका : पेठ 2, सवणा 2, मेरा बू 1, करतवाडी 2, चिखली शहर : 6, बुलडाणा तालुका : माळवांडी 1, ढासाळवाडी 1, दत्तपुर 1, धामणगाव 1, बुलडाणा शहर : 21, मलकापूर शहर : 3, मलकापुर तालुका : भाडगणी 1, धरणगाव 1, मोताळा तालुका : धा. बढे 1, बोराखेडी 3, रोहिणखेड 1, शेलापुर 3, शेगाव शहर : 2, शेगाव तालुका : जवळा 1, खामगाव शहर : 7, खामगाव तालुका: शिरसगाव देशमुख 2, नांदुरा शहर : 10, मूळ पत्ता बाळापूर जि. अकोला येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 113 रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मेहकर येथील 50 वर्षीय महिला व नांदुरा येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 161 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 45, मोताळा :2, खामगाव : 32, दे. राजा : 15, चिखली :1, मेहकर :1, मलकापूर :8, नांदुरा : 3, लोणार :20, शेगाव :24, जळगाव जामोद : 10,

तसेच आजपर्यंत 31550 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 6412 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 6412 आहे.

आज रोजी 647 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 31550 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7510 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 6412 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 999 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 99 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.