Buldhana Accident News | बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू, 25 ते 30 प्रवासी जखमी

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Buldhana Accident News | बुलढाण्यात खासगी दोन ट्रॅव्हल (Travels) बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Buldhana Accident News) झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मलकापूर शहरातील महामार्ग (क्रमांक-6) येथे झाला. या घटनेत जवळपास 6 जणांचा जागीच मृत्यू (6 People Died) झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी (Injured) झाले असल्याची माहिती आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही घटना आज (शनिवार) पहाटे घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, (एम एच 08. 9458) ही बस अमरनाथची तिर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्स मध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर (एम.एच 27 बी.एक्स. 4466) या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवासी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग (क्रमांक 6) वरती समोरासमोर धडकून भीषण अपघात (Buldhana Accident News) झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी (PI Ashok Ratnaparkhi), दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स (Ambulance) वेळेवर उपलब्ध झाली नाही.
त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय (Malkapur Upazila Hospital) येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Aurangabad Suicide News | धक्कादायक! दोन वर्षांच्या चिमुकलीसमोरच आई-वडिलाची गळफास घेत आत्महत्या

Terrorist Arrest In Pune | कोथरूडमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय देणाऱ्यास आर्थिक पुरवठा करणाऱ्या रत्नागिरी येथील एकाला अटक

Pune Anesthesiologist Arrested as Leader of ISIS Maharashtra Module, Sent in NIA Custody Till August 8

NCP MLA Dhananjay Munde | शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडे म्हणाले-‘भाजपाचा आधार घेणं…’