घरफोडी करणाऱ्या टोळीने दिली ३८ गुन्हे केल्याची कबुली

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन 

एका चोरीचा तपास करताना गोंदिया पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. या टोळीची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी तब्बल ३८ गुन्हे केल्याचे पोलिस तपासात निषन्न झाले आहे. घरफोडीचे १८, मोटारसायकल चोरीचे १९, चोरीचे नऊ असे एकूण ३८ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक हरीष बैजल यांनी पोलिस पथकाचे अभिनंदन करून गुन्हे शाखेला १५ हजार रुपयांचे दोन रिवार्ड देण्याची घोषणा केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95090397-cc3c-11e8-9622-3b7ba2ca6985′]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बापट लॉन परिसरातील निखील रुपारेल यांच्या घरी २२ सप्टेंबरला चोरी झाली होती. यामध्ये चोरट्यांनी ८ लाख २० हजार रुपये किमतीचे ३२.५ तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग याचा तपास करत असताना चोरट्यांना पकडण्यात त्यांना यश आले. पोलिसांनी रोहन अविनाश नागज्योती (१९), बबन सुरेश भागडकर (२०), आणि मनिष विजय राय (२५) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला तसेच अन्य ३८ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

हुंड्यासाठी विवाहीतेचा मानसिक छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

शहरात झालेल्या इतर चोऱ्यातही हे आरोपी सामील होते. ८ नोव्हेंबरला ९८ हजार रुपयांचे दागीने, २१ फेब्रुवारीला ७३ हजार ५०० रुपयांचे दागीने, ८ जुलैला १६ हजार १०० रुपयांचे दागीने, ३० मे ला ३७ हजार रुपयांचे दागीने, २७ जूनला ९१ हजार ५०० रुपयांचे एलईडी टीव्ही, रोख पैसे आणि दागीने, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ हजार ५०० रुपये रोख आणि ३१ मे ला १७ हजार दोनशे रुपये किमतीचे टीव्ही आणि  रोख रक्कम चोरल्याची कबूली या चोरांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला आत्तापर्यंत घरफोडीचे १८, मोटारसायकल चोरीचे १९, चोरीचे नऊ असे एकूण ३८ गुन्हे उघड करण्यात यश आले. त्याबद्दल पोलीस अधीक्षक हरीष बैजल यांनी अभिनंदन करून गुन्हे शाखेला १५ हजार रुपयांचे दोन रिवार्ड देण्याची घोषणा केली. चोरीचे सोने विक्रीकरिता कुणी आल्यास त्याबाबत पोलिसांना कळवावे. चोरीचे सोने अथवा इतर दागीने खरेदी न करता त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन बैजल यांनी केले.

[amazon_link asins=’B00CHXQD7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca4f51d2-cc3c-11e8-b61d-e30a55d18257′]