Business Idea | 500 ते 5000 रुपये प्रति किलोने विकले जाते ‘हे’ प्रॉडक्ट, ‘या’ बिझनेसद्वारे लवकर बनू शकता करोडपती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Business Idea | शेतीद्वारे जर तुम्हाला बंपर कमाई करायची असेल तर आम्ही तुम्हाला एका अशा प्रॉडक्टबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमच्या नशीबाचे दरवाजे उघडू शकतात. हा असा बिझनेस आहे ज्यात एका झटक्यात मालामाल होण्याची संधी आहे. हे प्रॉडक्ट काळी हळद आहे. तिचा समावेश सर्वात जास्त महागड्या प्रॉडक्टमध्ये होतो. काळ्या हळदीत जास्त औषधी गुणधर्म असल्याने तिची किंमत खुप जास्त आहे. (Business Idea)

 

काळ्या हळदीच्या शेतीतून शेतकरी मोठा नफा कमावू शकतात. काळ्या हळदीच्या पानांवर मध्ये एक काळी रेषा असते. त्याचे मूळ आतून काळसर किंवा जांभळ्या रंगाचे असते. काळ्या हळदीची शेती कशी केली जाते आणि किती नफा होतो, ते जाणून घेवूयात…

 

कधी आणि कशी करावी शेती

काळ्या हळदीची शेती जून महिन्यात केली जाते. ही शेती चिकट मातीत चांगली होते. काळ्या हळदीची शेती करताना लक्षात ठेवले पाहिजे की, शेतात पाणी साठू नये. एक हेक्टरमध्ये काळ्या हळदीचे सुमारे 2 क्विंटल बियाने लावता येते. या पिकासाठी जास्त सिंचनाची गरज नसते. शिवाय यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची गरज नसते. कारण याला किड लागत नाहीत. चांगल्या पिकासाठी शेतीपूर्वी चांगल्या प्रमाणात शेणखत टाकल्यास चांगले उत्पन्न मिळते. (Business Idea)

 

कोविडनंतर वाढली मागणी

सामान्य पिवळी हळद 60 ते 100 रूपये प्रति किलो दराने विकली जाते. तर काळी हळद 500 ते 4000 रूपये किंवा यापेक्षा जास्त किंमतीला मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या काळात काळी हळद मिळणे खुप कठीण आहे. कोविडनंतर तिची मागणी खुप वाढली आहे. इम्युनिटी बूस्टर म्हणून तिचा वापर केला जातो. काळी हळद आपल्या औषधी गुणांमुळे प्रसिद्ध आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि अनेक महत्वाची औषधे बनवण्यासाठी तिचा वापर केला जातो.

 

इतका मिळू शकतो नफा

एक एकरातील काळ्या हळदीच्या शेतीतून कच्ची हळद सुमारे 50-60 क्विंटल म्हणजे सुकी हळद समारे 12-15 क्विंटलपर्यंत सहज मिळते.
काळ्या हळदीच्या शेतीमध्ये उत्पादन जरी कमी असले तरी तिची किंमत खुप जास्त असते.
काळी हळद 500 रूपयांपर्यंत सहज विकली जाते.
असे सुद्धा शेतकरी आहेत ज्यांनी काळी हळद 4000 रूपये किलोने विकली आहे.

अनेक वेबसाईटवर काळी हळद 500 रुपये ते 5000 रूपयांना मिळते.
जर तुमची काळी हळद केवळ 500 रूपयांनी जरी विकली गेली तर 15 क्विंटलमध्ये तुम्हाला 7.5 लाख रूपये नफा होईल.
जर 4000 रूपये किलोने विकली गेली तर तुम्ही घरबसल्या मालामाल होऊ शकता.

 

Web Title :- Business Idea | business idea black turmeric farming kali haldi earn high profit know how to start

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा