Business Idea | केवळ 25,000 रुपयात सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दर महिना लाखो रुपयांची होईल कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | जर तुम्हाला कोणताही बिझनेस सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी आयडिया देणार आहोत, ज्यात किरकोळ गुंतवणुकीसह बिझनेस सुरू करू शकता. हा एक असा बिझनेस आहे, ज्याच्याशिवाय लोकांचा सकाळचा नाश्ता अर्धवट राहतो. हा बिझनेस पोहे बनवण्याच्या यूनिट (Poha Manufacturing Unit) चा आहे. हा एक चांगला बिझनेस आहे. याची मागणी दरमहिना कायम असते. हिवाळा असो की उन्हाळा लोक मोठ्या चवीने पोहे खातात. (Business Idea)

 

पोह्याला न्यूट्रिटिव्ह फूड मानले जाते. ते नाश्यात खाल्ले जातात. ते बनवणे आणि पचवणे दोन्ही सोपे आहे. याच कारणामुळे पोह्याचे मार्केट वेगाने वाढत आहे. यासाठी तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग यूनिट लावून आपला बिझनेस सुरूकरू शकता.

 

पोहा मॅन्युफॅक्चरिंग यूनिट बिझनेससाठी भांडवल
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या एका प्रोजेक्टनुसार, पोहा मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये सुमारे 2.43 लाख रुपयांचे भांडवल लागते. यामध्ये 90 टक्केपर्यंत तुम्हाला कर्ज मिळते. अशावेळी तुम्हाला पोहा मॅन्युफॅक्चरिंग यूनिट बिझनेसची सुरूवात करण्यासाठी सुमारे 25000 रूपयांची व्यवस्था करावी लागेल. (Business Idea)

 

Poha Manufacturing Unit मध्ये साहित्याची गरज
हा बिझनेस सुरू करण्यासाठी सुमारे 500 वर्ग फूट जागेची आवश्यकता भासते. एक पोहा मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह छोटे-मोठ्या साहित्याची गरज भासते. केव्हीआयसीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या बिझनेसच्या सुरूवातीला थोडा कच्चा माला आणा, नंतर याचे प्रमाण हळुहळु वाढवत जा. यातून अनुभव सुद्धा चांगला मिळेल, सोबतच बिझनेस सुद्धा वाढेल.

असे मिळेल लोन
केव्हीआयसीच्या या रिपोर्टनुसार, जर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला
आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर सुमारे 90 टक्के कर्ज मिळू शकते.
केव्हीआयसीद्वारे दरवर्षी ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी कर्ज दिले जाते. तुम्ही सुद्धा याचा फायदा घेऊ शकता.

 

किती होईल कमाई
प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर तुम्हाला रॉ मटेरियल घ्यावे लागेल. यावर सुमारे 6 लाख रुपये खर्च होतील.
याशिवाय तुम्हाला सुमारे 50 हजार रूपये खर्च करावे लागतील. अशाप्रकारे तुम्ही जवळपास 1000 क्विंटल पोह्याचे प्रोडक्शन करू शकता.
ज्यावर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 8.60 लाख रूपये येईल. तुम्ही 1000 क्विंटल पोहा जवळपास 10 लाख रूपयांत विकू शकता.
म्हणजे तुम्हाला सुमारे 1.40 लाख रूपयांची कमाई होऊ शकते.

 

Web Title :- Business Idea | business idea poha manufacturing unit with low investment earn lakh rupee per month know how to start

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Tanaji Sawant | शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले – ‘हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू’