पत्नीचा खून केल्यानंतर व्यापार्‍यानं मारली 5 व्या मजल्यावरून उडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीने आपल्या 55 वर्षीय आजारी पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यवसायिक असणाऱ्या पतीने पत्नीचा खून करून पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मरिन लाइन्स रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या चिरा बाजार येथील महेंद्र मेन्शन येथे घडली. आनंद मखेजा असे पत्नीचा खून करून आत्महत्या करणाऱ्या व्यवसायिकाचे नाव आहे.

मखेजा हे पत्नी कविता, मुलगी दिपा तसेच भाऊ आणि त्याच्या पत्नीसोबत महेंद्र मेन्शन येथे रहात होते. त्यांचा चेंबूर येथे इलेक्ट्रॉनिक्सची एजन्सी आहे. कविता या मागील अनेक वर्षापासून आजारी होत्या. चौकशीमध्ये त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असल्याची माहिती समोर आली. वाद जरी असले तरी गंभीर मुद्दा नसल्याचे एल टी मार्ग पोलिसांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळी पोलीस नियंत्रण कक्षाकडून एल टी मार्ग पोलिसांना फोन आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मखेजा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

पोलिसांनी मखेजा याच्या शेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान एका शेजाऱ्याने सांगितले की, त्यांचा मुलगा इमारतीमध्ये आला असता त्याने काहीतरी कोसळल्याचा आवाज ऐकला. त्यावेळी आनंद मखेजा हे रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

आत्महत्या करण्यापूर्वी मखेजा यांनी पत्नीचा चाकूने सपासप वार करून खून केला. खून केल्यानंतर त्यांनी स्वत: आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. कविता यांच्यावर सात वार करण्यात आले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारतीमध्ये सीसीटीव्ही नाही मात्र, मखेजा यांच्या घरात असलेला सीसीटीव्ही गुरुवारी रात्री बंद करण्यात आला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like