CAA Before Loksabha Polls 2024 | गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात CAA लागू करणार

नवी दिल्ली : CAA Before Loksabha Polls 2024 | नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act 2019) हा देशाचा कायदा असून याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे. निवडणुकीपूर्वीच CAA कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी मोठी घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली आहे. ते दिल्लीतील ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलत होते. (CAA Before Loksabha Polls 2024)

डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने या कायद्याला मंजुरी दिली होती. यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता. विशेषता मुस्लिम बांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. आता पुन्हा एकदा या कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली असली तरी कोणाचेही नागरिकत्व या कायद्यामुळे रद्द होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

अमित शाह म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा हे काँग्रेसचे वचन होते. देशाची फाळणी झाली तेव्हा देशातील अल्पसंख्याकावर अत्याचार झाले. तेव्हा काँग्रेसने निर्वासितांचे भारतात स्वागत करून त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आता मागे हटत आहेत. हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही.

अमित शाह म्हणाले, देशातील अल्पसंख्याकांना आणि विशेषतः मुस्लिम समुदायातील लोकांना त्यांचे नागरिकत्व
काढून घेतले जाईल, असे भडकवले जात आहे. परंतु, सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेतले जाणार नाही.
कारण तशी तरतूदच नाही. सीएए हा बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे.

अमित शाह म्हणाले, ३१ डिसेंबर २०१४ च्या आधी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन,
बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे या कायद्याचे
उद्दीष्ट आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wanwadi Crime | पुणे : फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार

पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला काही दिवसातच जामीन मंजूर

पुणे : रस्त्यालगत लघुशंका केल्याच्या कारणावरुन वार, दोघांना अटक