मोदी सरकारची मोठी घोषणा ! सप्टेंबरपर्यंत घेवु शकता 3 फ्री LPG सिलेंडर, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान उज्ज्वला योजना (PMUY) बद्दल केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत शासनाने मोफत गॅस सिलिंडर योजनेत तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध असतील. सरकारी तिजोरीवर 13,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली.

मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत एलपीजी सिलिंडर योजनेचा विस्तार केला आहे. त्याअंतर्गत त्यांना सप्टेंबरपर्यंत मोफत एलपीजी सिलिंडर मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री म्हणाले की, ज्यांनी जूनपर्यंत आपले तीन सिलिंडर घेतले नाहीत, ते आता सप्टेंबरपर्यंत 3 मोफत सिलिंडर घेऊ शकतील. ते म्हणाले 7.4 कोटी महिला लाभार्थ्यांना तीन सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली होती. लोकांनी पहिले आणि द्वितीय सिलिंडर घेतले, परंतु तिसरे सिलिंडर लोकांनी घेतले नाही. तिसरे सिलिंडर जे जूनमध्ये संपणार होते, ते आता सप्टेंबरपर्यंत सिलिंडर घेऊ शकतात.

जेव्हा तुम्ही उज्ज्वला योजनेत एलपीजी कनेक्शन घेता तेव्हा स्टोव्हसह एकूण किंमत 3,200 रुपये असते. यात 1,600 रुपयांचे अनुदान थेट सरकारकडून दिले जाते आणि उर्वरित रक्कम 1,600 रुपये तेल कंपन्या देतात, पण ग्राहकांना ईएमआय म्हणून तेल कंपन्यांना 1,600 रुपये द्यावे लागतात.

केंद्र सरकारने सन 2016 मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली. त्यावेळी बीपीएल अर्थात दारिद्र्य रेषेखालील लोक हे विनामूल्य गॅस कनेक्शन मिळविण्यास पात्र होते, परंतु नंतर या योजनेची व्याप्ती एससी आणि एसटी कुटुंब तसेच पीएमएवाय प्रधानमंत्री आवास योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी वाढविण्यात आली होती. कोरोना संकटात पीएमयूवाय अंतर्गत गरीब कुटुंबांना एलपीजी सिलिंडरचे विनामूल्य वितरण केले जात आहे. पंतप्रधानांच्या गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत सरकारने एप्रिल 2020 ते जून 2020 पर्यंत तीन मोफत एलपीजी सिलिंडर जाहीर केले होते.