‘कॅफे कॉफी डे’वर होतं ७००० कोटींचं कर्ज, ‘गायब’ झालेल्या मालक सिध्दार्थ यांनी CFO ला केला शेवटचा ‘कॉल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘कॅफे कॉफी डे’चे (CCD) मालक व्ही.जी. सिद्धार्थ सोमवारपासून संशयास्पदरित्या बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मोबाइल फोनदेखील बंद येत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ हे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते एसएम कृष्णा यांचे जावई आहेत. त्यानंतर आता पोलीस त्यांचा तपास करत असून आतापर्यंत त्यांचा काहीही तपास लागलेला नाही.

लापता हुए CCD के मालिक वीजी. सिद्धार्थ

मात्र आता त्यांच्याविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. व्ही.जी. सिद्धार्थ यांच्यावर सुमारे ७००० कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हे शेवटच्या वेळी कंपनीच्या सीएफओ यांच्याशी ५६ सेकंद फोनवर बोलले होते. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी कंपनीची काळजी घेण्यासाठी सांगितले. ज्यावेळी त्यांनी सीएफओ यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यावेळी ते फार निराश होते, अशी माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर त्यांनी शेवटचा फोन झाल्यानंतर आपला मोबाईल लगेच स्विच ऑफ केला. या प्रकरणी पोलीस युद्धपातळीवर तपास करत असून ते ज्याठिकाणी गाडीतून उतरले त्या अंतरापासून ६०० मीटर अंतरावर समुद्र असल्यामुळे मोठी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कॉफी किंग व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी कन्नड पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि कोस्ट गार्डची मदत घेतली आहे. जवळपास २०० जण त्यांचा शोध घेत आहेत.

ड्रायव्हरने सांगितले नक्की काय झाले

सिद्धार्थ यांच्या ड्रायव्हरला याविषयी पोलिसांनी विचारले असता त्याने सांगितले कि, मी मागील ३ वर्षांपासून त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर असून सकाळी ८ वाजता मी त्यांना घेऊन सुरुवातीला ऑफिसला गेलो. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता त्यांनी सकलेशपुरमध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला जरा फिरून येतो असे सांगितले. त्यानंतर मात्र तासाभरानंतर देखील ते न परतल्याने त्याने कुटुंबियांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत याविषयी तक्रार दाखल केली.

67092776_10156598136909499_7635535744353697792_n_073019090125.jpg

आरोग्यविषयक वृत्त –