गरोदरपणात पिऊ नका कॉफी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महिलांनी गरोदरपणात कॉफीचं सेवन केलं तर त्याचे परिणाम बाळावर होण्याची शक्यता असते. एका संशोधनानुसार, गरोदर महिलेने जर दिवसाला तीन कप पेक्षा कॉफीचं सेवन केलं तर पोटातील बाळं लठ्ठ होऊ शकते. गरोदर महिलेने दिवसाला तीन कप पेक्षा जास्त कॉफीचं सेवन केलं तर बाळ लठ्ठ होण्याचा ३० टक्क्यांनी धोका वाढतो. तीन कपपेक्षा जास्त कॉफीचं सेवन केल्यास लठ्ठपणाचा धोका ६६ टक्क्यांनी वाढतो.

कॅफनचं सेवन केल्यानंतर ते शरीराबाहेर जाण्यासाठी फार कालावधी लागतो. त्यामुळे ते कॅफेन शरीरातचं राहत आणि बाळाच्या मेंदूपर्यंत पोहोचतं. गरोदर महिलांनी गर्भपात टाळण्यासाठी दररोज २०० ग्रॅमपेक्षा जास्त कॉफीचं सेवन करू नये. या संशोधनासाठी ५० हजार ९४३ आई-मुलांच्या जोड्यांचा समावेश कऱण्यात आलेला. यामध्ये सहभागी झालेल्या महिलांना गरोदर असताना २२ आठवड्यांमध्ये कोण-कोणते पदार्थ आणि पेय यांच्या सेवनासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये जवळपास २५५ खाद्यपदार्थांचा समावेश होता. कॅफेन हे फक्त कॉफीमध्ये नसून ब्लॅक टी, चॉकलेट, चॉकलेट मिल्क, सोडायुक्त पेय, डेसर्ट, गोड पदार्थ, केक या पदार्थांमध्येही असतं. गरोदरपणात कॅफेनचं सेवन केल्याने त्याचा परिणाम बाळ आठ वर्षांचं होईपर्यंत त्याच्या वजनावर होतो. त्यामुळे बाळाचा लठ्ठपणा टाळण्यासाठी गरोदर महिलांना शक्यतो कॉफी पिणं टाळावं.