Calum MacLeod | कॅलम मॅक्लिओडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

पोलीसनामा ऑनलाईन : Calum MacLeod | स्कॉटलँडचा (Scotland) तडाखेबाज फलंदाज कॅलम मॅक्लिओडने (Callum McLeod) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. मॅक्लिओडनं 2007 मध्ये स्कॉटलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सध्या ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) स्कॉटलँडच्या संघाचा तो सदस्य होता.

“या विश्वचषकानंतर निवृत्त होणे कठीण आहे. कारण आम्ही जे यश मिळवण्यासाठी आलो होतो, ते आम्हाला मिळालेलं नाही. योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास हा संघ खूप पुढं जाईल आणि अनेकांना प्रेरणा देईल अशी इच्छा मनात ठेवून मी संघाची साथ सोडत आहे. मला माझ्या देशाकडून 229 सामने खेळण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो. मला वाटते की, मी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून संघ खूप चांगल्या स्थितीत आहे.” असे मॅक्लिओड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना म्हणाला.

मॅक्लिओडची अवस्मरणीय खेळी
मॅक्लिओडने आपल्या कारकिर्दीत एकूण पाच विश्वचषक खेळले आहेत. त्याने 2018 मध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडविरुद्धच्या (England) एकदिवसीय सामन्यात त्यानं 140 धावांची झंझावती खेळी केली होती. मॅक्लिओडच्या या वादळी खेळीच्या जोरावर स्कॉटलँडच्या संघानं इंग्लंडसमोर 372 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होते. मॅक्लिओडच्या (Calum MacLeod) या खेळीच्या जोरावर स्कॉटलँडच्या संघाने इंग्लंडवर चार धावांनी विजय मिळवला.

मॅक्लिओडची क्रिकेट कारकीर्द
मॅक्लिओडने 87 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 हजार 24 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतकं आणि 13
अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1 हजार 239 धावा केल्या आहेत.

टी-20 विश्वचषकात स्कॉटलँडची निराशाजनक कामगिरी
यंदाच्या टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) स्कॉटलँडच्या संघाची कामगिरी निराशाजनक झाली.
टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील तीन पैकी दोन सामन्यात स्कॉटलँडच्या संघाला पराभव स्वीकारावा लागल्याने
त्यांचे पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आले.

Web Title :- Calum MacLeod | calum macleod announced retirement from international cricket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Suspended | पिंपरी चिंचवडमध्ये तीन पोलीस निलंबित, भंगारवाल्याकडून घेतले होते पैसे

Narayan Rane | ‘राणेसाहेब… अजितदादांचा नाद करु नका’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा नारायण राणेंना सल्ला

Virat Kohli | पाकिस्तानच्या ‘या’ गोलंदाजाने विराटला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियावर होत आहे चर्चा