Narayan Rane | ‘राणेसाहेब… अजितदादांचा नाद करु नका’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा नारायण राणेंना सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्हा डीपीडीसी बैठकीत (Sindhudurg DPDC Meeting) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात शाब्दीक चकमक झाली. यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांच्यासह विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनाही लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने (NCP) नारायण राणे (Narayan Rane) यांना खोचक सल्ला दिला आहे.

काय म्हणाले नारायण राणे ?

शुक्रवारी झालेल्या या बैठकीनंतर नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली होती. कोणता विषय कधी घ्यावा, हे विनायक राऊत यांना समजत नाही. हे त्यांचे अज्ञान आहे. मी असताना विनायक राऊत सुरुवात करु शकतात का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. तसेच अजित पवार यांनी थापा मारण्याचे काम मीडियासमोर केले असून ते आपण ऐकलं आहे. त्यासाठी विशेष पत्रकार परिषद घेऊ असेही राणे म्हणाले.

राणे साहेब एक आपुलकीचा सल्ला!

दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी नारायण राणेंना
खोचक टोला लगावतानाच सल्लाही दिला आहे. अजित पवार थापा मारतात-नारायण राणे… राणे साहेब एक
आपुलकीचा सल्ला! बाकीच्यांचे ठीक आहे पण अजितदादांचा नाद करु नका, असं ट्विट वरपे यांनी केलं आहे.
अजितदादा थापा मारतात की काय करतात ते एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), पडळकर (Gopichand Padalkar) वगैरेंना विचारुन घ्या,
असा टोलाही वरपे यांनी लगावला.

Web Title :-Narayan Rane | ncp ravikant varpe tweet on narayan rane targeting ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘भविष्यात वेगळं काहीतरी… ‘, एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sourav Ganguly | सौरभ गांगुलीच्या BCCI अध्यक्षपदाचा वाद न्यायालयात, कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Politics | ‘रणछोडदास’ मैदान सोडून पळून गेले’, शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका