‘या’ महिलेने 131 रुपयाच्या ‘लॉटरी’ने जिंकले 31 कोटी, आता 30 वर्षापर्यंत मिळणार ‘दरमहा’ 9 लाख !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे एक म्हण आहे कि, देणारा देतो तेंव्हा छप्पर फाडून देत असतो. मात्र हि म्हण कॅनडात राहणाऱ्या विक्की मिशेल या महिलेच्या बाबतीत अतिशय योग्य बसली आहे.

सांकेतिक तस्वीर

या महिलेने 131 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. मात्र या महिलेला थेट 31 करोड रुपयांची लॉटरी लागली.

प्रतीकात्मक तस्वीर

42 वर्षीय हि महिला दोन मुलांची आई असून एका अकाउंटन्सी फर्ममध्ये सहायक म्हणून काम करते. महिलेने ज्यावेळी हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते त्यावेळी तिच्या खात्यात फक्त 131 रुपये होते. आणि त्याच 131 रुपयांनी तिचे नशीब उघडले.

प्रतीकात्मक तस्वीर

याविषयी बोलताना महिलेने सांगितले कि, ती नेहमी लॉटरीचे तिकीट खरेदी करत असे. याआधी तिने सर्वात जास्त रक्कम म्हणजे 878 रुपये जिंकले होते. मात्र त्यानंतर देखील ती तिकीट खरेदी करतच होती. मात्र यावेळी तिच्या भाग्याने तिला साथ देत 36 लाख पाउंड म्हणजेच 31 कोटी 55 लाख रुपये मिळवून दिले.

प्रतीकात्मक तस्वीर

पुढील 30 वर्ष तिला प्रत्येक महिन्याला 8 लाख 80 हजार रुपये मिळणार आहेत. महिलेने सांगितले कि, ज्यावेळी तिला लॉटरी जिंकल्याचा मेल आला त्यावेळी तिला वाटले कि, पुन्हा एखादी छोटी रक्कम जिंकली असेल मात्र तिने मेल उघडल्यानंतर तिला धक्काच बसला. तिला यावर विश्वासच बसत नव्हता.

प्रतीकात्मक तस्वीर

दरम्यान, हि लॉटरी जिंकल्यानंतर आता आपण आपल्या सर्व गरजा पूर्ण करणार असून एका सामान्य घरात आयुष्य घालवलेल्या मला मोठ्या घरात राहायला जायचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like